जातीवाचक शिवीगाळीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; कारवाईची मागणी

महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थीनीच्या पालकांनी आंदोलन छेडले असून कठोर कारवाईची मागणी केली
A 19 year old student in Tamil Nadu suicided as college authorities allegedly used casteist slurs with her
A 19 year old student in Tamil Nadu suicided as college authorities allegedly used casteist slurs with herसकाळ डिजिटल टीम

तामिळनाडूच्या नागापट्टीनममध्ये कॉलेज प्रशासनाने जातीवाचक शिवीगाळ आणि फी न भरल्याबद्दल छळ केल्याने 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुबाशिनी असे या तरुणीचे नाव असून ती एका खासगी महाविद्यालयात फिजिओथेरपीचे (physiotherapy) शिक्षण घेत होती. (A 19 year old student in Tamil Nadu suicided as college authorities allegedly used casteist slurs with her)

A 19 year old student in Tamil Nadu suicided as college authorities allegedly used casteist slurs with her
पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIA मुंबई शाखेला धमकीचे ई-मेल

महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थीनीच्या पालकांनी आंदोलन छेडले असून कठोर कारवाईची मागणी केली. आत्महत्येनंतर मृत मुलिंच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर, महाविद्यालयाच्या प्रशासकासह तिघांवर अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

A 19 year old student in Tamil Nadu suicided as college authorities allegedly used casteist slurs with her
अभियांत्रिकी महाविद्यालयात एकाच दिवशी तब्बल 24 विद्यार्थी पॉझिटिव्ह

सुबाशिनीच्या आत्महत्येनंतर कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. सुबासिनीला न्याय मिळावा या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये आंदोलनही केले. आंदोलनादरम्यान कॉलेज कॅम्पसमध्ये उभ्या असलेल्या बसची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे प्रकरण पायल तडवी या महाराष्ट्रातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीशी मिळते-जुळते आहे. २०१९ मध्ये महिला डॉक्टर पायल तडवीने जातीवर आधारित भेदभावामुळे आत्महत्या केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com