चक्क वळूने लोकल ट्रेननी केला 15 किमी प्रवास, Video व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

चक्क वळूने लोकल ट्रेननी केला 15 किमी प्रवास, Video व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायल होत असतात काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ अचंबित करणारे असतात. असाच एक अचंबित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

हा व्हिडीओ एका लोकल ट्रेनचा आहे. या व्हिडीओमधील दृश्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. या व्हिडिओत दिसते की लोकल ट्रेनमध्ये चक्क वळू प्रवास करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (a bull travelled 15 km in a local train in jharkhand video goes viral)

लोकल ट्रेन ही प्रवासाचं उत्तम साधन आहे. अनेकजण लोकल ट्रेननी प्रवास करतात पण लोकल ट्रेननी चक्क वळू प्रवास करत असेल तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरंय. या वळूने १५ किमी प्रवास केलाय. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

हा व्हिडिओ झारखंडचा आहे. लोकल ट्रेनमध्ये वळूला पाहून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसलाय. एका प्रवाशाने याबाबत सांगितले की एका टोळीने वळूला ट्रेनमध्ये आणलं आणि एका खांबाला बांधलं. आणि इतर प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर वळूला उतरवण्यास सांगितले होते. तेथील प्रवाशांनी संतापाने हा व्हिडिओ बनवलाय. सध्या हा व्हिडीओ व्हायरल झालाय.