चीनी महिलेने लावला चुना! डॉक्टरची 81 लाखांची फसवणूक

एका चिनी महिलेने आपली फसवणूक केल्याचा दावा छत्तीसगडमधील एका डॉक्टरने केला आहे.
Money fraud
Money fraudesakal

एका चिनी महिलेने आपल्याला गंडा घातल्या असल्याचा दावा छत्तीसगडमधील राजनांदगावमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने केला आहे. चिनी महिलेने आपली 81 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचं या व्यक्तीने म्हटलं आहे. मंगळवारी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पीडित व्यक्तीने दावा केला की, महिलेने त्याला क्रिप्टोकरन्सी योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले आणि त्याला तीनपट परतावा मिळेल असे आश्वासनही दिले. (A doctor in Chhattisgarh has claimed that a Chinese woman cheated on him.)

Money fraud
पुण्यात किडनी तस्करीचा प्रकार; 15 लाखांचं आमिष दाखवून महिलेची फसवणूक

या प्रकरणी डॉ. अभिषेक पाल यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे राजनांदगावचे पोलिस अधीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले. एका सोशल मीडिया साइटच्या माध्यमातून हाँगकाँगच्या एका महिलेच्या संपर्कात आला होता, असं फसवणूक झालेल्या डॉ. अभिषेक पाल यांने म्हटलं आहे. 'अन्ना ली' असे या महिलेचे नाव आहे, असं त्यानं म्हटलं आहे. अभिषेकचा दावा आहे की महिलेच्या सांगण्यावरून त्याने ट्रेडिंग अ‍ॅपमध्ये सुमारे 26 लाख रुपये गुंतवले. आतापर्यंत त्याने एकूण 81 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Money fraud
शैक्षणिक कर्जाच्या बहाण्याने देहूरोडला तरुणीची फसवणूक

ही योजना चालवणाऱ्या काही लोकांनी त्याच्याकडे टॅक्सचीही मागणीही केली होती आणि पाल यांनी हा टॅक्स भरल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. असे असूनही तो पैसे काढण्यात अपयशी ठरला. नंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. या प्रकरणी आयपीसी कलम आणि आयटी अॅक्टच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com