Video: मित्राला झोका द्यायला गेला दरीत पडता पडता वाचला!

वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन (social media) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात.
video viral
video viral

Shocking Video - वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन (social media) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहिल्यावर आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्या व्हिडिओमध्ये आपल्या मित्राला झोका देणं दुसऱ्या मित्राला चांगलच महागात पडलं असतं हे दिसून आलं आहे. झोका देण्यासाठी ते दोघे एका उंचीवरच्या ठिकाणावर गेले होते. तो व्हिडिओ पाहिल्यावर आपण काही काळ अवाक होऊन जातो. त्यावेळी प्रश्न असा पडतो की, त्या दोघांनी झोका खेळण्यासाठी अशा ठिकाणाची निवड का केली असावी? shocking video viral swinging friend

झोका खेळणं कुणाला आवडत नाही, आपल्यापैकी बऱ्याचजणांनी लहानपणी झोक्यावर झुलण्याचा आनंद घेतला असेल. आता जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामध्ये त्या दोन मुलांनाही तो मोह अनावर झाला. मात्र त्या दरम्यान एक मोठा अनर्थ टळल्याचे दिसून आले आहे. अनेकदा काही व्यक्ती सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर करण्याच्या नादात वेगवेगळ्या प्रकारचे साहस (thrilling video) करताना दिसून येतात. तशाच प्रकारचं एक साहस त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे. ते दोघेही झोक्याचा आनंद घेण्यासाठी एका धोक्याच्या ठिकाणी गेले. ती जागाच एवढी भयानक आहे की, त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही जास्त आहे. मित्राला झोका देताना त्या मित्राचा जीव वाचला आहे. त्याचं दैव बलवत्तर म्हणून तो दरीत पडता पडता वाचला आहे.

उंचावर असणाऱ्या कुठल्याशा डोंगराळ भागामध्ये ते दोघे मित्र गेले होते. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते की, एक मित्र दुसऱ्या मित्राला झोका देत आहे. त्यावेळी असं काय घडतं की, आपल्या काळजाचा ठोका चूकल्याशिवाय राहत नाही. ज्या मित्राला झोका दिला आहे तो दरीत पडताना वाचला आहे. हा व्हिडिओ पाहताना काही काळ आपण स्तब्ध होवून जातो. वास्तविक तो झोका देखील अशा ठिकाणी लावण्यात आला आहे की, तिथे तो खेळणे धोकादायक आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

video viral
Video : जिथं हॅप्पी न्यू इयरचं पहिलं सेलिब्रेशन तिथंच पहिली सेंच्युरी

झोका खेळताना त्या मित्राचा पाय घसरला. अशावेळी तो दरीत पडण्याची शक्यता अधिक होती. मात्र तो वाचला. त्याचं नशीब मोठं की, त्या प्रसंगातून वाचला आहे. तो काही काळ हवेतही लटकताना दिसतो आहे. त्याचा पाय त्या झोक्याच्या दोरीत अडकल्याचे दिसते आहे. जर त्याचा पाय त्या दोरीतून निसटला असता तर तो दरीत पडला असता आणि त्याचा जीव गेला असता... हे तो व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते. socialstarofficial च्या इंस्टा अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यत 25 मिलियन पेक्षाही अधिक व्ह्युज मिळाले आहेत. 9 लाख लोकांनी तो व्हिडिओ शेयरही केला आहे.

video viral
नववर्षात कपड्यावरील जीएसटी वाढणार,पाहा Video

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com