प्रेमासाठी कायपण! शिक्षिकेने प्रियकरासाठी गाठलं पाकिस्तान अन्...

तरुणी रेवा येथील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे.
viral
viralsakal

मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील 'तरहटी' गावातील एका शिक्षिकेला अमृतसरच्या अटारी सीमेवरून सीमा ओलांडताना अटक करण्यात आली आहे. या शिक्षिकेच्या जवळून पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आल्यापासून तरहटी गाव चांगलंच चर्चेत आले आहे. (a female teacher cross pakistan border to meet her boyfriend)

पाकिस्तानात जाणाऱ्या तरुणीचे नाव फिजा खान व वय २३ वर्षे आहे. ही तरुणी रेवा येथील एका खासगी शाळेत शिक्षिका आहे. तीन महिण्याआधीच तिला पासपोर्ट मिळाला होता.

viral
Video: पोलीस बॉयफ्रेंडनं केला विश्वासघात! एसपींनी 'ऑन द स्पॉट' लावला निकाल

ही तरुणी १४ जून रोजी पाकिस्तानला जाण्यासाठी घरातून पळून गेली होती. तिने ३ महिन्यांपूर्वीच आपला पासपोर्ट तयार करुन घेतला होता. जो पासपोर्ट भोपाळमधून जारी करण्यात आला होता. फिजा खानला २२ जून रोजी ९० दिवसांचा व्हिसा देखील जारी करण्यात आला होता. ही युवती कुटुंबात दोन बहिणी आणि एका भावात सगळ्यात मोठी आहे.

तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी फिजा खान ही खूप हुशार विद्यार्थिनी आहे. ती रेवा येथील कॉन्व्हेंट शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत होती.

viral
Video : प्रशासन बंडखोरांच्या पाहुणचारात व्यस्त, वेठीस पूरग्रस्त

घरच्यांना कल्पनाच नव्हती...

तिच्या कुटुंबातील लोकांना माहितच नव्हतं की आपली मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात पडली आहे. फिजाचे वडील छोटसं किराणा दुकान चालवतात, तर लहान बहीण आणि भाऊ शिक्षण घेत आहेत.

फिजाच्या वडिलांनी सांगितले की, आमच्या मुलीने पाकिस्तानला जाण्यासाठी पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळाला हे आम्हाला माहीती सुध्दा नाही. सेलने पाकिस्तानी मुलाचा केला पर्दाफाश

१४ जून रोजी मुलगी फिजा बेपत्ता झाल्यानंतर सायंकाळी तिच्या भावाच्या मोबाईलवर फेसबुक मेसेंजरवर फोन आला, मात्र फोनवर बोलणे झाले नाही. दिलशाद खान हे नाव पाहून त्याला संशय आला, त्यानंतर त्याने थेट पोलिस स्टेशन गाठून याबाबत माहिती दिली. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने मोबाईल फोन ट्रेस केला असता मोबाईल नंबर पाकिस्तानचा असल्याचे आढळून आले.

मुलीचा पासपोर्टही गायब होता, त्यानंतर तिच्याबाबत लूक आऊट नोटीस जारी केली होती. मुलीकडे पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसाही होता, पण ती पाकिस्तानात जाण्यापूर्वीच तिच्या नावाने लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आणि तिला अटक करण्यात आली.

viral
Maharashtra Politics : आसामचे CM सरमांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पोलिसांच्या तपासात पासपोर्ट सापडला

सायबर सेलच्या खुलाशानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता या मुलीने मार्च महिन्यात पाकिस्तानला जाण्यासाठी पासपोर्ट बनवला होता, असा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर मग पोलिसांनी युवतीच्या मेसेंजरची चौकशी केली असता, ही युवती पाकिस्तानात गेल्याचे उघड झाले.

viral
सुनेने केले सासूचे अंत्यसंस्कार; मुलगा म्हणाला...

बराच काळापासून ही युवती पाकिस्तानी मुलाच्या संपर्कात होती.

फिजा खानने एक-दोन व्यक्तींना आधीच सांगितले होते की दिलशाद खान नावाच्या एका पाकिस्तानी मुलासोबत माझं अफेअर सुरु आहे. तिने त्याचा फोटोही त्या व्यक्तींना दाखवला होता.

फिजा खान अमृतसर येथून पकडली गेली. एसपी नवनीत भसीन यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक मेसेंजरमध्ये मुलीच्या भावाला पाकिस्तानच्या नंबरवरून सतत कॉल येत होते. सायबर सेलचा तपास पूर्ण झाल्यानंतर 20 जून रोजी लूक आउट नोटीस (LOC) काढण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय सीमेवरील सर्व विमानतळ आणि बंदरांना पोलीस मुख्यालय भोपाळ (LOC) द्वारे माहिती देण्यात आली, त्यानंतर 25 जून रोजी पोलिसांना यश आले आणि अमृतसरच्या अटारी सीमेवरून फिजा खानला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com