रमजानमध्ये हिंदू व्यक्तीने दिली मशिदीला चकाकी |Ramzan Eid | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mosque

रमजानमध्ये हिंदू व्यक्तीने दिली मशिदीला चकाकी

सांप्रदायिकता हे भारताचे वैशिष्ट्ये आहेत.आपल्या देशात एकीकडे हिंदु-मुस्लिम वाद चिघळताना दिसतो तर दुसरीकडे तेच हिंदु-मुस्लिम एकजुटीने राहताना दिसतात.याचा प्रत्यय दिलाय केरळच्या एका हिंदू व्यक्तीने. त्याने रमजान सुरू होण्यापूर्वी त्याच्या शेजारच्या मशिदीला नवीन रंग देत मशिदीला चकाकी दिली. त्याच्या या कार्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (A Hindu has given a fresh coat of paint to the mosque just before Ramzan)

हेही वाचा: हिजाब वादात अल कायदाची उडी, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याकडून मुस्कान खानचं कौतुक

रमजान महिन्याच्या सुरवातीला मशिदींची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्याची प्रथा असते केरळमधील मलप्पुरमच्या वट्टलूर येथील मस्जिदुल उमरूल फारूकच्या मशिदीला कोरोनानंतर आलेल्या अडचणींमुळे गेल्या काही वर्षांपासून स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आली नव्हती. मात्र कतारहून आलेले पीव्ही सूर्या नारायणन (५८) यांना रमझानच्या दोन आठवड्यांपूर्वी मशिदीच्या भिंती रंगविलेल्या नसल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी मशिदीच्या व्यवस्थापनाला त्याबद्दल विचारपूस केली आणि रंगवण्याची व्यवस्था केली. त्यांनी पेंटिंगचे काम त्यांचे चुलत भाऊ पीव्ही अजयकुमार यांच्याकडे सोपवले जे बांधकामाचा व्यवसाय करतात.

त्यानंतर रमजान सुरू होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या शेजारच्या नवीन रंग देत मशिदीला चकाकी दिली.

हेही वाचा: पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

मुस्लिम धर्मीयांच्या रमजान महिन्याला 3 एप्रिलपासून सुरुवात झालीय. रमजानचा महिना अतिशय पवित्र मानला जातो.

Web Title: A Hindu Has Given A Fresh Coat Of Paint To The Mosque Just Before Ramzan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..