
धक्कादायक! हुंड्यासाठी पत्नीला दिली न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी
तामिळनाडू: तमिळनाडुतील गांधीपुरम येथे पत्नीचे अश्लील फोटो काढून तीला धमकावत हुंडाची मागणी करणाऱ्या एका ३२ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीला अटक करण्यात आली आहे. सी पिचाईमुथू हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे तर पिडीत पत्नी ही शहरातील एका खासगी बँकेत कनिष्ठ कार्यकारी म्हणून काम करत होती. या दोघांनी ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केले होते.
पोलीस अधिकारी सांगताात, "लग्नाच्या वेळी, तिच्या आईवडीलांनी ५१ तोळे सोन्याचे दागिने आणि 5 लाख रुपये सी पिचाईमुथू याच्या कुटुंबाला हुंडा दिला होता. लग्नानंतर सी पिचाई हा पत्नीला म्हणाला की तिच्या चेहऱ्यावर मुरुम आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत आयुष्य घालायला आवडत नाही. जेव्हा तिने ही बाब त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी हुंडा म्हणून घराची मागणी केली."
याहुन धक्कादायक म्हणजे पिचाइमुथूने जबरदस्तीने आपल्या पत्नीचे कपडे उतरवले आणि तिचे नग्न फोटो काढले. त्यानंतर हे फोटो तिला धमकवण्यासाठी पिचाइमुथू वापरत होता. एवढेच नाही तर त्याने तिचा विनयभंगही केला. याच दरम्यान पिचाइमुथूच्या कुटुंबीयांनी शनिवारी तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिने कोईम्बतोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये येथे उपचार घेतले. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.