Zomato वरुन मागवलेल्या कॉफीत सापडला चिकनचा तुकडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 chicken piece in coffee

Zomato वरुन मागवलेल्या कॉफीत सापडला चिकनचा तुकडा

अनेकदा आपण फुड ऑर्डर मागवतो. आणि फुड डिलिव्हर झाल्यानंतर आपल्याला फुड आवडत नाही पण दिल्लीत एका व्यक्तीसोबत धक्कादायक घटना घडली. या व्यक्तीने एका रेस्टॉरंटमधून झोमॅटोवरुन एक कॉफी ऑर्डर केली. पण कॉफी हाती येताच त्याला धक्का बसला. या कॉफीत त्याला चक्क चिकनचं पीस आढळलं. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होतंय. (a man found chicken piece in coffee goes viral)

सुमित सौरभ नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन हि माहिती दिली आणि त्याच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली.

हेही वाचा: मागास विद्यार्थ्यांसाठी मिळणार UPSCचे मोफत प्रशिक्षण; केंद्राची योजना

सुमितने झोमॅटोवरुन दिल्लीतील एका रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली आणि कॉफीमध्ये चिकनचा पीस आढळल्यानंतर त्याने ट्विटरवरुन झोमॅटो आणि थर्ड वेव्ह इंडिया या रेस्टॉरंटला चांगलेच खडे बोल सुनावले. सुमितने त्याच्या पत्नीसाठी ही कॉफी मागवली होती जी शाकाहरी आहे.

सुमित म्हणाला, “मी झोमॅटोवरुन थर्डवेव्ह इंडिया नावाच्या रेस्टॉरंटमधून कॉफी ऑर्डर केली होती, पण त्यांनी मर्यादाच ओलांडली. कॉफीमध्ये एक चिकन पीस आढळले. आता Zomato सोबतचे माझे नाते आज संपत आहे."

हेही वाचा: कानपूर दंगलीवरून राजकारण तापलं; मायावती स्पष्टच म्हणाल्या, राष्ट्रपती-पंतप्रधानांनी..

सुमितने याआधीही झोमॅटोवरुन फुड मागविण्याचा अनुभव सांगितला. सुमितने नवरात्रीमध्ये वेज बिर्याणी मागितली होती मात्र झोमॅटोने त्यावेळीही चुक करत नॉन-व्हेज बिर्याणीऐवजी नॉनव्हेज बिर्याणी पाठवली होती.

सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण बरंच गाजतय. या प्रकरणावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Web Title: A Man Found Chicken Piece In Coffee Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :viralChickenzomatoOrder
go to top