Video: धक्कादायक! पत्नीकडून मुख्याध्यापक पतीला चक्क बॅटने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: धक्कादायक! पत्नीकडून मुख्याध्यापक पतीला चक्क बॅटने मारहाण

घरगुती हिंसाचाराचे अनेक प्रकरणे समोर येतात. यात प्रामुख्याने महिला अत्याचाराचे प्रमाण अधिक असते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक पत्नी तिच्या नवऱ्याला बॅटनी बेदम मारहाण करताना दिसत आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील हा प्रकार असून पिडित नवरा हा एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. सध्या या व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. (a wife beating headmaster-husband with a bat domestic violence video goes viral)

हेही वाचा: Taj Mahal : 'ताजमहाल'च्या मशिदीत नमाज अदा करणाऱ्या 4 पर्यटकांना अटक

मुख्याध्यापकाची पत्नी त्याला सातत्याने त्रास द्यायची. याला त्रासून पतीने पत्नीविरोधात गोळा करण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यामधील एक फुटेज समोर आलंय ज्यात पत्नी चक्क पतीला बॅटने मारहाण करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सर्व प्रकरण त्यांच्या लहान मुलासमोर घडलय.

हेही वाचा: शारीरिक संबंधानंतर तरुणानं लग्नास दिला नकार, दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सध्या हे प्रकरण न्यायालयात पोहचले असून मुख्याध्यापकाने सुरक्षेसाठी दाद मागितली तर न्यायालयाने त्याला सुरक्षा देण्याचे आदेश दिले. सहसा महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी होतात पण या प्रकरणात चक्क पुरुष आणि तोही सुशिक्षित मुख्याध्यापक घरगुती हिंसाचाराचा बळी झालाय.

Web Title: A Wife Beating Headmaster Husband With A Bat Domestic Violence Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top