Liquor Policy Case : ‘आप’ कार्यकर्त्यांचे सामूहिक उपोषण

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या (आप) देशभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपोषण केले. दिल्लीत जंतर-मंतरवर झालेल्या सामूहिक उपोषण आंदोलनात पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते.
Liquor Policy Case
Liquor Policy Casesakal

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या (आप) देशभरातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी उपोषण केले. दिल्लीत जंतर-मंतरवर झालेल्या सामूहिक उपोषण आंदोलनात पक्षाचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी मोठा कट रचून केजरीवाल यांना अटक केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

‘‘आप नेत्यांनी मद्य धोरण गैरव्यवहार केल्याचा आरोप तपास संस्था करीत आहेत. मग गैरव्यवहारातील पैसा कोठे गेला? हे का दाखविले जात नाही,’’ असा सवाल दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी यावेळी केला. केजरीवाल लवकरच तुरुंगातून बाहेर येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘

‘मद्य धोरण प्रकरणात सीबीआयकडे २९४ तर ईडीकडे १६२ साक्षीदार आहेत. दोन्ही तपास संस्थांनी ५० हजारापेक्षा जास्त पानांचे दोषारोपपत्र बनविले आहे. मात्र एकूण साक्षीदारांपैकी केवळ चार लोकांनीच केजरीवाल यांचे नाव घेतले आहे,’’ अशी माहिती आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी यावेळी दिली.

दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, प. बंगाल, ओडिशा तसेच अन्य राज्यांप्रमाणे अमेरिकेतील न्यूयॉर्क, बोस्टन, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन डीसी, कॅनडामधील टोरांटो, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, ब्रिटनमधील लंडन तसेच जर्मनी आणि नार्वे या देशांत असलेल्या आप कार्यकर्त्यांनी सामूहिक उपोषणात सहभाग घेतला असल्याचे आप नेते गोपाल राय यांनी सांगितले.

Liquor Policy Case
Loksabha Election 2024 : ‘महायुती’ आणि ‘मविआ’त तिढा कायम ; शिंदे गट नाशिकसाठी आक्रमक,ठाकरे गट-काँग्रेस उत्तर मुंबईसाठी आग्रही

दरम्यान, दिल्ली प्रदेश भाजपने केजरीवाल यांच्या बंगल्याची प्रतिकृती पालिका बाजारमध्ये ठेवत त्याला ‘शराब का शीशमहल’ असे नाव देत आंदोलन केले. ‘‘दिल्लीचे लोक कुतुब मिनार, अक्षरधाम मंदिर, लोटस टेंपल, कर्तव्य पथ बघू शकतात, मग आपल्या मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा राजवाडा ते का पाहू शकत नाहीत,’’ असा टोला यावेळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव यांनी लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com