AAP Goa : आम आदमी पार्टीने गोव्यातील कार्यकारिणी केली बरखास्त, जाणून घ्या कारण

arvind kejriwal
arvind kejriwalsakal

आम आदमी पक्षाने (आप) गोव्यातील सध्याची संघटना प्रदेशाध्यक्षपद वगळता तात्काळ बरखास्त केली आहे. नवी संघटनात्मक रचना लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाने कळवले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आम आदमी पक्षाने आपली संघटना तात्काळ बरखास्त केली असली तरी प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवले आहे. 'आप'ने ट्विट करून लिहिले की, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडत गोवा राज्यातील सध्याची संघटना तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात येत आहे. अमित पालेकर प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतील. नवी संघटनात्मक रचना लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. 

गोव्यातील संघटना बरखास्त केल्यानंतर 'आप' पक्षाची सर्व पदे नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपवणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यासोबतच विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्येही मोठे फेरबदल होणार असल्याचे वृत्त आहे.

arvind kejriwal
Niti Aayog Meeting : निती आयोगाच्या बैठकीत काय घडलं?, नरेंद्र मोदी काय म्हणाले?

२०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी आप'ने मोठा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

आम आदमी पार्टीला २०२२ मध्ये गोव्यासाठी राज्य पक्षाचा दर्जा मिळाला होता. गोवा विधानसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाने राज्य पक्षाचा दर्जा दिला होता. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही गोव्यातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले होते.

arvind kejriwal
Modi Video : संतांकडून पंतप्रधान मोदींनी स्वीकारलं 'सेंगोल', तमिळ परंपरेनुसार होणार स्थापना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com