Sanjay Singh: मला तोंड उघडायला लावू नका.. जेलमध्ये टाकल्याबद्दल आपच्या नेत्याने मानले मोदींचे आभार

आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. तिहार तुुरुंगामध्ये एक कुख्यात अपराधी आहे. त्याची त्याच्या कुटूंबाशी आणि वकीलांशी भेट घडवून आणली जाते, असा दावा त्यांनी केला आहे.
sanjay singh
sanjay singhsakal

आपचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. तिहार तुुरुंगामध्ये एक कुख्यात अपराधी आहे. त्याची त्याच्या कुटूंबाशी आणि वकीलांशी भेट घडवून आणली जाते, असा दावा त्यांनी केला आहे.

त्याअगोदर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगामध्ये छळ होत असल्याचे म्हंटले होते. ते म्हणाले की, "मला तोंड उघडायला लावू नका. मी ६ महिने जेलमध्ये राहून आलो आहे."

संजय सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला की जे काही होत आहे ते तुरुंग मॅन्युअलनुसार होत आहे, असा तुरुंग प्रशासनाचा दावा आहे. ते म्हणाले होते की, "भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भलेही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांचे मनोबल खचवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करुन तुरुंगात पाठवले, परंतु त्यांचे मनोबल खचण्याऐवजी अजून मजबूत झाले आहे."

संजय सिंह यांनी सोमवारी (१५ एप्रिल) व्हिडीओ शेअर सांगितले आहे की, " गेल्या १० दिवसांपासून मी तुरुंगातून बाहेर आहे. मला आता खुप शांत झोप लागत आहे. मी ६ महिने जेलमध्ये राहिलो. यादरम्यान मला काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. पंतप्रधान मोदींनी जर ही संधी दिली नसती तर मी स्वत:ला कधीच भेटू शकलो नसतो. त्या सर्व महापुरूषांशी माझी कधी भेट झाली नसती."

"त्या सर्व क्रांतिकारकांशी मी कधी बोलू शकलो नसतो, ज्यांच्याबद्दल मी फक्त ऐकले होते. त्यांच्या गोष्टी मी वाचल्या होत्या कारण जेव्हा एखादा व्यक्ती एकांतात असतो, तेव्हा त्याला खुप काही विचार करण्याची, समजून घेण्याची आणि चिंतन करण्याची संधी मिळते," अस संजय सिंह यांनी म्हंटल आहे.

sanjay singh
Sanjay Singh : ईडीचं नो ऑब्जेक्शन! 'आप'चे खासदार संजय सिंग यांना जामीन मंजूर

संजय सिंह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो कि त्यांनी मला स्वत:ला भेटण्याची आणि माझी वाटचाल अजून मजबूत करण्याची मला संधी दिली. आज खुप सारी माध्यमे विकली गेली आहेत परंतु इतिहास कधीच विकला जात नाही. जे तुम्ही करता त्याचा इतिहास रचला जातो. काय बरोबर आहे? काय चूकीच आहे? हे लोक ठरवतात."

ते पुढे म्हणाले की, "तुरुंगात जावून मी माझे ३० वर्षांचे संघर्षमय जिवन अजून मजबूत बनवले. तसेच स्वत:ला हा विश्वास दिला की, मी जे काम करत आहे ते अगदी बरोबर आहे. मी त्याचं वाटेवर अजून ताकदीने पुढे जाईल."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com