'सत्ता द्या, मोफत तीर्थयात्रा करा!' उत्तराखंडला अरविंद केजरीवालांचं आश्वासन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Arvind-Kejriwal

'सत्ता द्या, मोफत तीर्थयात्रा करा!' उत्तराखंडला अरविंद केजरीवालांचं आश्वासन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

डेहराडून : आम आदमी पक्ष जर सत्तेवर आला तर विविध धर्माच्या लोकांसाठी मोफत धार्मिक यात्रेची योजना सुरु करु, असं आश्वासन आप पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी दिलंय. याआधी उत्तराखंडच्या दौऱ्यात केजरीवाल यांनी शेतकऱ्यांना मोफत बीज आणि प्रत्येक घरासाठी तीनशे युनिट मोफत वीज अशी आश्वासने दिली होती.

हेही वाचा: जानेवारीपासून सुरु होणार 'राफेल'चं अपग्रेडिंग; बसवली जाणार शस्त्रास्त्र

आताच्या या दौऱ्यात त्यांनी हरिद्वारमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलंय की, हिंदूंना अयोध्या, मुस्लिमांना अजमेर शरीफ, तर शिखांना करतारपूर साहिब येथे यात्रा करता येईल, अशी योजना आम्ही आणू. आम्ही दिल्लीत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरु केली आहे. त्यांना हरिद्वारसह देशभरातील १२ तीर्थक्षेत्रांची यात्रा वातानुकूलित रेल्वेतून करता येते. भोजन आणि निवास व्यवस्था मोफत केली जाते. आतापर्यंत ३६ हजार नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेला आप हा देशातील पहिला पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला. पुढे केजरीवाल म्हणाले की, आमचा भर चांगली रुग्णालये, चांगल्या शाळा आणि चांगले रस्ते उभे करण्यावर आहे.

हेही वाचा: गुजरातमधील कंपनीवर‘प्राप्तिकर’ ची कारवाई

रिक्षावाल्यांसोबत बैठक

या दौऱ्यात केजरीवाल यांनी रिक्षावाल्यांसह बैठक घेतली. दिल्लीप्रमाणे त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते म्हणाले की, हरिद्वारच्या रिक्षावाल्यांना रोजीरोटीचा खर्च भागविण्यासाठी रोज संघर्ष करावा लागतो. तुमचा मोठा भाऊ म्हणून मी काम करेन. तुमच्या समस्या सोडविणे ही माझी जबाबदारी असेल. दिल्लीचे रिक्षाचालक आपचे चाहते आहेत. आमच्या विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शाळा, रुग्णालये बांधण्यावरून मते मागावीत असे आव्हान मी भाजप आणि काँग्रेसला देतो. या दोन क्षेत्रांबाबत केवळ ‘आप' चर्चा करते. आपला एक संधी द्या असे आवाहन मी उत्तराखंडच्या जनतेला करतो. मग तुम्ही भाजप आणि काँग्रेसला कायमचे विसरून जाल, असंही त्यांनी म्हटलंय.

loading image
go to top