जानेवारीपासून सुरु होणार 'राफेल'चं अपग्रेडिंग; बसवली जाणार शस्त्रास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rafale_Arms1
जानेवारीपासून सुरु होणार 'राफेल'चं अपग्रेडिंग; बसवली जाणार शस्त्रास्त्र

जानेवारीपासून सुरु होणार 'राफेल'चं अपग्रेडिंग; बसवली जाणार शस्त्रास्त्र

नवी दिल्ली : भारत-फ्रान्स दरम्यान झालेल्या राफेल विमानांच्या खरेदीपैकी भारताला आत्तापर्यंत ३० विमान सुपूर्द करण्यात आली आहेत. तर उर्वरित सहा विमानांची शेवटची खेप पुढील वर्षी एप्रिल २०२२ पर्यंत मिळणार आहे. दरम्यान, तत्पूर्वी जानेवारी महिन्यापासून या विमानांचं अपग्रेडिंग अर्थात त्यामध्ये भारतीय शस्त्रास्त्र बसवण्याचं काम सुरु होणार आहे. रविवारी सरकारी सुत्रांनी एएनआयला याबाबत माहिती दिली.

सरकारी सुत्रांनी सांगितलं की, "भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या एका उच्चस्तरीय टीमनं तपासणी केलेल्या RB-008 लढाऊ विमानांच्या कामगिरीचं मुल्यांकन करण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झाली आहे. या विमानांमध्ये भारतातील विशिष्ट शस्त्रे बसवण्यात येणार आहेत. सन २०१६ फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये डीलदरम्यान यावर सहमती झाली होती.

हेही वाचा: देशात सध्यातरी बुस्टर डोसची आवश्यक नाही - ICMR

एकदा हवाई दलाकडून या सुधारणांना मंजुरी मिळाली तर राफेलला अधिक सक्षम बनवण्यासाठी पुढील वर्षी जानेवारीपासून अपग्रेडशन सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये अत्याधुनिक क्षेपणास्त्र, कमी बँडची जॅमर्स आणि आपल्या आवश्यकतेनुसार, उपग्रह दळणवळण प्रणाली बसवण्यात येईल.

राफेल विमानांची RB आणि BS सिरीज काय आहे?

भारताला ३६ राफेल विमानं मिळणार असून ज्यांचे टेल नंबर RB आणि BS सरीजमधील असतील. माजी हवाईदल प्रमुख राकेश भदोरिया यांच्या नावानं RB सिरीज असेल ज्यांनी या डीलमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. तर BS सिरीज ही माजी हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या नावाची आहे. सर्व विमानं हवाई दलात समाविष्ट झाल्यानंतर हवाईल दलाच्या ताफ्यात RB सिरीजची आठ टूसीटर ट्रेनर विमानं असतील तर BS सिरीजची २८ सिंगलसीटर विमानं असतील.

loading image
go to top