AAP MLA from Punjab Balbir Singh sentenced to three years
AAP MLA from Punjab Balbir Singh sentenced to three yearsAAP MLA from Punjab Balbir Singh sentenced to three years

मेहुणीला मारहाण करणे भोवले; आपचे आमदार बलबीर सिंग यांना शिक्षा

Published on

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारला मोठा झटका बसला आहे. पटियाला ग्रामीणचे आमदार डॉ. बलबीर सिंग (Balbir Singh) यांना रोपर न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नऊ वर्षांपूर्वी जमिनीवरून झालेल्या कौटुंबिक वादातून बलवीर सिंहने पत्नी आणि मुलासह मेहुणी आणि पतीला मारहाण केली होती. (AAP MLA from Punjab Balbir Singh sentenced to three years)

मारहाण प्रकरणी डॉ. बलबीर सिंग (Balbir Singh) यांची मेहुणी आणि पतीने गुन्हा दाखल केला होता. दोघांनी बलबीर, त्याची पत्नी आणि मुलावर क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप केला होता. नऊ वर्षांपासून रोपर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने आमदार, पत्नी आणि मुलाला दोषी ठरवले. यानंतर तिघांनाही तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

AAP MLA from Punjab Balbir Singh sentenced to three years
फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला; मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहे की...

पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीत डॉ. बलबीर सिंह यांनी काँग्रेसच्या मोहित मोहिंद्राचा ५३ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. तीन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर आता आमदारकी गमावण्याचा धोका आहे. नियमानुसार एखाद्या आमदाराला दोन किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा झाल्यास आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रवी इंदर सिंग यांनी आमदारासह तीन आरोपींना तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा (sentenced) सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com