AAP MP Sanjay Singh
AAP MP Sanjay SinghEsakal

"मला वर पाठवण्याची तयारी होती"; आप खासदाराचा न्यायालयात ED वर गंभीर आरोप

Sanjay Singh: AAP MP makes serious allegations against ED in court.

AAP MP Sanjay Singh: दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दारु घोटाळ्यात अटक असलेले आपचे खासदार संजय सिंह यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली आहे. पाच दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. संजय सिंह सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून ईडीने त्याच्या पुढील कोठडीची मागणी केली होती. त्यांचे निकटवर्तीय सर्वेश मिश्राही सहकार्य करत नसल्याचे ईडीने म्हटले आहे.

सुनावणीदरम्यान बोलताना खासदार संजय सिंह यांनी धक्कादायक अरोप केला.  संजय सिंह यांनी आपल्या जीवाला असल्याचे सांगितले तसेच 'मला वर पाठवण्याची तयारी होती', असे सांगितले.

संजय सिंह म्हणाले, "मला रात्री साडेदहा वाजता सांगण्यात आले की तुम्हाला बाहेर नेण्यात येत आहे. मी विचारल्यावर मला तुघलक रोड पोलीस स्टेशनला नेण्यात येणार असल्याचे मला सांगितले. मी त्यांना विचारलं न्यायाधीशांची परवानगी आहे का?. यावेळी माझ्याकडून लेखी घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी देखील हा प्रकार घडला. याचा अर्थ त्यांचा दुसरा अजेंडा होता. आता न्यायाधीश साहेब, त्यांना विचारा कुणाच्या सांगण्यावरून मला वर पाठवायची तयारी होती. माझी एवढीच विनंती आहे की मला कुठेही नेतांना न्यायाधीशांना याची माहिती असावी. "

AAP MP Sanjay Singh
Supriya Sule: 'अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास...', सुप्रिया सुळेंनी घातली देवेंद्र फडणवीस यांना अट

संजय सिंह यांना तुघलक रोड पोलिस ठाण्यात नेले नाही, असे ईडीने आपल्या जबाबात म्हटले आहे. त्यांना इतर अनेक ठिकाणी चौकशीसाठी नेण्यात आले होते. सिंहच्या चौकशीतून अनेक महत्त्वाची माहिती जमा झाली आहे. न्यायाधीशांनी मात्र या प्रकरणावर भाष्य केले नाही. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. (Latest Marathi News)

संजय सिंह यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्या घरावर छापा टाकून 10 तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर त्यांला अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. संजय सिंह यांच्यापूर्वी 'आप'चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया आणि विजय नायर यांनाही दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

AAP MP Sanjay Singh
ED Action : व्हिवो अन् लाव्हा मोबाईल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई - रिपोर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com