esakal | अरे वाह! आता अँटिबॉडीज चाचण्या होणार जलद गतीने; अबॉट भारताला पुरवणार 10 लाख किट..
sakal

बोलून बातमी शोधा

antibody testing kits

एखाद्या व्यक्तीला कोरोनाविषाणूचा (कोविड-19) संसर्ग होऊन गेला होता का, हे निश्चित करणाऱ्या आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा अबॉटने सुरू केला आहे.    

अरे वाह! आता अँटिबॉडीज चाचण्या होणार जलद गतीने; अबॉट भारताला पुरवणार 10 लाख किट..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  एखाद्या व्यक्तीला कोरोनाविषाणूचा (कोविड-19) संसर्ग होऊन गेला होता का, हे निश्चित करणाऱ्या आयजी-जी अँटिबॉडीच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगशाळा आधारित रक्त चाचणी साहित्याचा पुरवठा अबॉटने सुरू केला आहे.    

अबॉट या चाचणीची दहा लाख किट्स भारतात पुरवणार आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू-कश्मीर व गुजरातमधील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना या किट्स पुरवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: बापरे! मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कामगारांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; 'हे' आहे कारण..

अबॉटने नुकतेच बाजारात आणलेले सार्स-सीओव्ही-2 आयजी-जी चाचणी किट आरोग्यसेवा कर्मचारी, रोगप्रतिकारशक्ती दुबळी असलेल्या व्यक्ती, फ्रण्टलाइन कर्मचारी किंवा कोरोना प्रभावित क्षेत्रातील जनता यांसारख्या धोक्यातील लोकसंख्येमधील संक्रमणाचा प्रसार समजून घेण्यासाठी वापरले जाऊ शकते. या चाचण्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्षणविरहित रुग्णांमधील प्रसाराविषयी महत्वाची माहिती मिळणार आहे. 

तसेच यामुळे सार्वजनिक आरोग्य उपायांच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यात मदत होणार आहे. एकंदर कोविड-19 परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन यामुळे मिळणार असल्याचे अबॉटच्या भारतातील डायग्नोस्टिक्स व्यवसायाचे महाव्यवस्थापक व कंट्री हेड नरेंद्र वर्दे यांनी सांगितले.

भारतात या चाचणीचे मूल्यमापन करणाऱ्या पहिल्या काही रुग्णालयांमध्ये मुंबईतील हिंदुजा, कस्तुरबा तसेच कोलकात्यातील अपोलो रुग्णालयाचा समावेश आहे.  कोविड-19साठी आरटी-पीसीआर पॉझिटिव आलेल्या रुग्णांसाठी या चाचण्यांचे प्रारंभिक निदान अचूक ठरले असल्याने ही चाचणी क्लिनिशियन्स व समुदायांसाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

अबॉटची सार्स-सीओव्ही-2 आयजी-जी चाचणी विशेषत्वाने आयजी-जी अँटिबॉडींचे निदान करते. आयजी-जी हे एक प्रथिन असून, संसर्गाच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये शरीर हे प्रथिन तयार करते. रुग्ण कोविड-19 आजारातून बरा झाल्यानंतर काही महिने किंवा अगदी वर्षापर्यंतही हे प्रथिन त्याच्या शरीरात राहू शकते. 

हेही वाचा: बसच्या माहितीसाठी प्रवाशांना बेस्ट हेल्पलाईनची मदत; दररोज शेकडो कॉलची नोंद.. 

ही चाचणी ARCHITECT®️ i1000SR आणि i2000SR या प्रयोगशाळा उपकरणांवर करण्यात आली. ही उपकरणे भारतभरातील रुग्णालये व प्रयोगशाळांमध्ये बसवण्यात आली असून, त्यावर तासाभरात 100-200 चाचण्या केल्या जाऊ शकतात. त्यामुळे साथीच्या काळात अँटिबॉडी चाचण्या खात्रीशीर मार्गाने होऊ शकतात. लक्षणे दिसून लागल्यानंतर 17 दिवसांनी किंवा त्याहून अधिक काळाने ही चाचणी केलेल्या रुग्णांमध्ये या चाचण्यांचे निष्कर्ष 99.9 टक्के अचूक व 100 टक्के संवेदनशीलतेसह आले असा संशोधकांचा निष्कर्ष आहे.
abbot will provide 10 lac kits to India for antibody testing