esakal | 'भारत-पाकिस्तान दोन्ही देश सारखेच दिसतात'; अभिनंदन वर्धमान यांचा व्हिडिओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

abhinandan vardhman

बालाकोट एअरस्ट्राईक दरम्यान भारताचे विंग कमांडर वर्धमान यांचं विमान चुकीने पाकिस्तानमध्ये कोसळलं होतं.

'भारत-पाकिस्तान दोन्ही देश सारखेच दिसतात'; अभिनंदन वर्धमान यांचा व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : बालाकोट एअरस्ट्राईकला गेल्या 26 फेब्रुवारीला दोन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पाकिस्तानने आता एक नवा व्हिडीओ जाहीर केला आहे. पाकिस्तानने भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा एक नवा व्हिडीओ व्हायरल केला आहे. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून बालाकोट एअरस्ट्राईक करण्यात आला होता. या एअरस्ट्राईक दरम्यान भारताचे विंग कमांडर वर्धमान यांचं विमान चुकीने पाकिस्तानमध्ये कोसळलं होतं. त्यावेळी त्यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्यानंतर भारताच्या आणि जागतिक दबावामुळे 1 मार्च रोजी त्यांना वाघा बॉर्डरवरुन परत भारताकडे सुपूर्द केलं होतं. त्यावेळी पाकिस्तानने अभिनंदन यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल करुन स्वत:ची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. आणि आता त्याच पठडीतला एक व्हिडीओ पुन्हा एकदा पाकिस्तानने तब्बल दोन वर्षांनंतर व्हायरल केला आहे जो पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर केला जातो आहे. 

हेही वाचा - 'आम्हाला मत दिलं तर बेरोजगारी 40 टक्क्यांनी कमी करु' अमित शहा यांचं आश्वासन
काय आहे या व्हिडीओत?
या व्हिडीओत अभिनंदन वर्धमान यांनी काश्मीरमध्ये शांततेचे आवाहन तसेच पाकिस्तान आणि भारतात कसलेही अंतर नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी यामध्ये पाकिस्तानी आर्मीचे कौतुक देखील केल्याचे दिसत आहे. मात्र, हा व्हिडीओ अनेक ठिकाणी कट आणि एडीट केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. याआधीचे व्हिडीओदेखील याचप्रमाणे कट एडीट केलेले होते. पाकिस्तान आपली प्रतिमा सुधारण्यासाठी या व्हिडीओंचा वापर करत असल्याचंही अनेक जण आरोप लावत आहेत.  

या व्हिडीओत अभिनंदन वर्धमान म्हणताना दिसताहेत की, वरुन जेंव्हा मी पाहिलं तेंव्हा दोन्ही देशांमध्ये काहीही अंतर वाटत नव्हतं. इतकंच नव्हे तर जेंव्हा मी खआली कोसळलो तेंव्हा हे देखील समजलं नाही की मी कोणत्या देशात आहे.  जेंव्हा मी खाली कोसळलो तेंव्हा मला जबर जखम झाली होती आणि मी हालचालही करु शकत नव्हतो. मी कुठे आहे, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेंव्हा मला लक्षात आलं की मी माझ्या देशात नाहीये, तेंव्हा मी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही लोक माझ्या मागे लागले जे मला पकडू इच्छित होते.  पुढे ते पाकिस्तानी सैन्याचं कौतुक करत म्हणताना दिसतात की, तेंव्हा पाकिस्तानी सैन्याचे दोन जवान आले आणि त्यांनी मला वाचवलं. त्यांनी मला प्रथमोपचार दिले आणि आता मी त्यांच्याच मदतीमुळे सुखरुप आहे. काश्मीरसोबत जे होत आहे ते ना मला माहितीय ना आपल्याला मात्र, यावर आपल्याला शांतपणे विचार करायला हवा, असं ते म्हणताना दिसतात. 

हेही वाचा - Corona : देशात 113 रुग्णांचा शनिवारी मृत्यू; रुग्णसंख्येत वाढ

27 फेब्रुवारी 2019 रोजी अभिनंदन वर्धमान यांच्यावर वाईटरित्या हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर पाकिस्तान बॅकफूटवर गेला होता. भारताने या व्हिडीओवरुन जिनेव्हा संधीची आठवण पाकिस्तानला करुन दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकने याप्रकारचे व्हिडीओ प्रसारित केल्याचं म्हटलं जात आहे. 

loading image