esakal | प्रवासी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

प्रवासी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
दीनानाथ परब

भोपाळ: प्रवासी बस (bus) आणि कंटेनर ट्रकची (container truck) धडक झाली आहे. या भीषण अपघातात (Accident) सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. १३ जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशात (Madhya pradesh) विरखादी गावाजवळ भिंड येथे हा भीषण अपघात झाला.

१३ जखमींपैकी चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना ग्वालियर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नेमका हा अपघात कसा घडला, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, असे भिंडचे एसपी मनोज सिंह यांनी सांगितले.

हेही वाचा: किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

अपघातानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम सुरु आहे. काही प्रवाशांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच प्राण सोडले. पोलिसांकडून आता मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा: नांदेड पोटनिवडणूक: भाजपा शिवसेनेच्या सुभाष साबणेंना उमेदवारी देणार?

मृतांमध्ये पाच पुरुष आणि दोन महिला आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग एनएच ९२ वर हा भीषण अपघात झाला. बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक झाली. दुर्घटनाग्रस्त बस ग्वालियरहून बरेलीला जात होती.

loading image
go to top