
Tragic Bike Accident in Bahraich: एका दुचाकीवरून प्रवास करणं ६ जणांच्या जीवावर बेतलंय. सहा जणांपैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यात ही दुर्घटना घडलीय. बहराइचहून एका दुचाकीवर बसून ६ जण घरी निघाले होते. पण ट्रॅक्टरच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनं कुटुंबियांसह गावावर शोककळा पसरलीय. ट्रॅक्टरची धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला आणि गाडीवर असणारे लोक रस्त्यावर जोरात आदळले.