धुक्यामधून आला लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज; पाहताच बसला धक्का

Accident of two school vehicles and student died
Accident of two school vehicles and student diedAccident of two school vehicles and student died

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये दोन शालेय वाहनांची धडक (Road accident) झाली. या अपघातात दोन विद्यार्थ्यांसह वाहन चालकाचा मृत्यू झाला. तसेच सात मुले जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मुझफ्फरनगरमधील सिटी कोतवाली भागातील बधना मोर येथे हा अपघात झाला. (Accident of two school vehicles and student died)

प्राप्त माहितीनुसार, पहाटे हा अपघात घडल्यानंतर घटनास्थळी ओरडण्याचा आवाज येत होता. वाहनांची धडक इतकी जोरदार होती की स्कूल बस आणि मिनिबसचे मोठे नुकसान (school vehicles) झाले. अपघातात बसमधील मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. धुक्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. तसेच मुलांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न सुरू केले.

Accident of two school vehicles and student died
बुलडाणा : लग्न जुळत नसल्याने युवकाने स्वतःचे सरण रचून केली आत्महत्या

या अपघातातील मुले आणि जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे एक विद्यार्थी, विद्यार्थिनी व चालकाचा मृत्यू (student died) झाला. विद्यार्थी तक्षक मलिक आणि लक्ष्य मलिक या दोन सख्ख्या भावांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमी विद्यार्थी जीडी गोयंका पब्लिक स्कूलचे आहे.

मिनिबस होती भरधाव

गुरुवारी पहाटे मुझफ्फरनगरच्या जनसाठ रोडवर असलेल्या जीडी गोयंका पब्लिक स्कूल आणि सर रवींद्र नाथ टागोर पब्लिक स्कूलची वाहने (school vehicles) मुलांना घेऊन शाळेत जात होती. बुढाणा मोर ते शहापूर या रस्त्यावर दोन्ही वाहनांची धडक (Road accident) झाली. दाट धुक्यात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जीडी गोयंका पब्लिक स्कूलची मिनिबस भरधाव असल्यामुळे मुले व चालक गंभीर जखमी झाले.

Accident of two school vehicles and student died
तस्लिमा नसरीन म्हणाल्या, हिजाब, बुरखा आणि निकाब हे अत्याचाराचे प्रतीक

नागरिकांनी केली मदत

घटनास्थळी लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी वाहने थांबवली. लोकांनी मदतकार्य सुरू केले आणि अपघाताची माहिती पोलिसांना दिली. बसच्या अपघाताची माहिती मिळताच घाबरलेल्या मुलांचे पालकही घटनास्थळी पोहोचू लागले. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या जखमी मुलांना बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com