धक्कादायक ! छेडछाडीला विरोध केला म्हणून केला ऍसिड हल्ला..  

उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

छेडछाडीला विरोध करणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर गुंडांनी ऍसिड टाकल्याची घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात घडली. यासंदर्भात दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे

छेडछाडीला विरोध करणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावर गुंडांनी ऍसिड टाकल्याची घटना बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात घडली. यासंदर्भात दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. बक्‍सर आणि समस्तीपूर या जिल्ह्यांत दोन महिलांना जाळून मारण्याच्या घटना नुकत्याच घडलेल्या असताना हा नवा हल्ला झाला आहे. 

महत्त्वाची बातमी : महिलांचं WhatsApp स्टेटस पाहणाऱ्यांनो सावधान, पोलिस ठोकतील तुम्हाला बेड्या
 

हल्ला झालेली मुलगी 16 वर्षांची असून, ऍसिड हल्ल्यात ती होरपळल्यामुळे तिला उपचारांसाठी पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वैकुंठपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उसरी या गावात काल रात्री उशिरा घडली. पीडितेच्या आईने दिलेल्या जवाबानुसार पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून, या गावातीलच मुन्ना साह याचा मुलगा 
सोनू कुमार आणि मिश्री साहचा मुलगा राजा कुमार यांची कसून चौकशी करून त्यांना अटक केली.

दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, जलद गतीने तपास करून गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल. 

- मनोज कुमार तिवारी, पोलिस अधीक्षक

महत्त्वाची बातमी : खातेवाटपासंदर्भात बाळासाहेब थोरात  यांचा गौप्यस्फोट, म्हणाले..
 

ही मुलगी रात्री घरात स्वयंपाक करत असताना हे दोन तरुण घरात घुसले आणि इंजेक्‍शनच्या सीरिंजमधून त्यांनी या मुलीवर तेजाब टाकल्याचे पीडितेच्या आईने सांगितल्याची माहिती पोलिस तपास अधिकारी मनोज कुमार यांनी दिली. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याची उजवी बाजू होरपळली आहे. तिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यावर पाटण्याला नेण्यात आले.

दोन्ही तरुणांची या मुलीवर वाईट नजर होती आणि ते तिला सतत छेडत होते. मुलीच्या आईने या तरुणांना गेल्या आठवड्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर वाद झाला होता. राज्यात ऍसिड विक्रीवर निर्बंध असूनही या तरुणांकडे ते कोठून आले, याचाही तपास केला जात आहे.

WebTitle : acid attack on sixteen years old girl in patana 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: acid attack on sixteen years old girl in patana