crime news
crime newsesakal

Karnataka : बंगळूर पोलिस अॅक्शन मोडवर; घरांवर छापे टाकत तब्बल 1344 गुडांविरुद्ध कारवाई

पोलिसांनी (Bangalore Police) काल पहाटे बंगळुरातील दंगलखोरांच्या घरांवर छापे मारले.
Summary

त्यांना कोणत्याही प्रकारच्या उपद्रवी, बेकायदेशीर कृत्ये आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला.

बंगळूर : शहर पोलिसांनी (Bangalore Police) काल पहाटे बंगळुरातील दंगलखोरांच्या घरांवर छापे मारले. शहरातील आठ प्रभागातील १,३४४ गुडांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली. यावेळी ९.१ किलो गांजा, गुन्ह्यांसाठी साठवलेली हत्यारे आणि १६ वाहने जप्त करण्यात आली.

आरोपींविरुद्ध कायद्यांतर्गत दोन तर एनडीपीएस कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, या कारवाईत तपास प्रकरणांमध्ये न्यायालयाकडून जारी केलेल्या गुंडाविरुद्ध ४६ अजामीनपात्र वॉरंट जारी केले. फरार झालेल्या आरोपींना अटक करून संबंधित न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

crime news
Muslim Nation : 'हा' मुस्लिम देश आफ्रिका, युरोप आणि मध्य आशियासाठी का ठरतोय सर्वात महत्त्वाचा देश?

पश्चिम विभागात १७७, दक्षिण विभागात १७५, उत्तर विभागात २५४, मध्य विभागात ९०, पूर्व विभागात २०७, दक्षिण पूर्व विभागात १६०, ईशान्य विभागात १५६, व्हाईटफिल्ड विभागात १२५ घरांवर छापे टाकले. पोलसांनी गुंडांना पोलिस स्थानकांत नेऊन त्यांची चौकशी केली.

crime news
Kolhapur Riots : दंगलीनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर; Internet Service पुन्हा सुरु

त्यांना कोणत्याही प्रकारच्या उपद्रवी, बेकायदेशीर कृत्ये आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी न होण्याचा इशारा दिला. पोलिसांनी काही टोळ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. पहाटे पाच वाजता सुरू झालेलं हे छापा सत्र सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com