रामायण मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारलेले श्याम सुंदर यांचे निधन

actor shyam sundar aka ramayanas sugriva passes away
actor shyam sundar aka ramayanas sugriva passes away

कालका (हरियाणा): दूरदर्शनवरील पौराणिक मालिका रामायणमध्ये सुग्रीव ही भूमिका साकारणारे आणि लोकप्रियता मिळवणारे अभिनेते श्याम सुंदर यांचे पिंजौरमध्ये निधन झाले. रामायण या मालिकेत श्रीरामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात रामायण मालिकेचे पुन्हा प्रसारण केले जात आहे.

अरूण गोविल यांनी ट्विटरवर शोकसंदेश लिहला आहे. त्यांनी लिहिले की, 'श्री. श्याम सुंदर यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:खी आहे. त्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत सुग्रीवची भूमिका साकारली होती. खूप चांगले व्यक्तिमत्व आणि एक सज्जन व्यक्ती. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.' अरूण गोविल यांनी ट्विट केल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांसोबत त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. रामायणाच्या रिपीट टेलीकास्टमुळं खुश असणारे चाहते आता आवडत्या कलाकाराच्या निधनाने दु:खात आहेत.

रामायण या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले सुनील लहरी यांनीही ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'श्याम कलानी यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला. रामायण या मालिकेत त्यांनी सुग्रीवाची भूमिका साकारली होती. देव त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यासाठी शक्ती देवो...

श्याम सुंदर यांनी त्यांच्या करियरची सरुवात रामायण या मालिकेपासूनच केली होती. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. ते हरियाणातील कालका जवळील पिंजौर गावात राहत होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com