सुशांतच्या वहिनीनेही सोडला प्राण...

वृत्तसंस्था
Tuesday, 16 June 2020

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतच्या वहिनी सुधा देवी यांना धक्का बसल्याने त्यांनी प्राण सोडला.

पूर्णिया (बिहार): अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतच्या वहिनी सुधा देवी यांना धक्का बसल्याने त्यांनी प्राण सोडला.

सुशांतला आत्महत्या करायला भाग पाडलं? बॉलिवूडची काळी बाजू येतेय समोर

सुशांतच्या मृत्यूची माहिती समजल्यानंतर सुशांतच्या चुलत भाऊ अमरेंद्र सिंग यांची पत्नी सुधा देवी (वय 48) यांनी अन्न, पाणी सोडले होते. त्यांना मोठा धक्का बसला होता. सुधा देवी या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मात्र, सुशांतच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. धक्क्यामुळे त्या सतत बेशुद्ध पडत होत्या. शुद्धीवर आल्यानंतर सुशांत कसा आहे? एवेढेच विचारत असे. पण, घरासमोर झालेली गर्दी पाहून त्या पुन्हा बेशुद्ध पडत होत्या. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. अमरेंद्र सिंग याने सांगितले की, 'सुधा देवीची सोमवारी सकाळी तब्येत बिघडली. सायंकाळी पाच वाजता तिने शेवटचा श्वास घेतला. आधी भाऊ सोडून गेला, आता पत्नी सोडून गेली. मोठा दुःखाचा प्रसंग उभा राहिला आहे.'

'सुशांतच्या आत्महत्येस हिंदी चित्रपटसृष्टी जबाबदार'; कंगनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील लाॅबीवर ओढले ताशेरे

दरम्यान, सुशांतने रविवारी (ता. 14) मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कूपर रुग्णालयात रविवारी रात्रीच तीन डॉक्टरांच्या पथकाने त्याच्यावर शवविच्छेदन केले. सोमवारी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून त्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वांद्रे पोलिसांनी दिली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलेही व्यसन केले नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले. त्याच्या बँक खात्यातील तपशिलानुसार त्याला आर्थिक अडचण नसल्याचेही पोलिसांच्या माहितीत समोर आले आहे. सोमवारी मुंबईमध्ये सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: actor sushant singh rajputs ailing sister in law passes away at bihar