'सुशांतच्या आत्महत्येस हिंदी चित्रपटसृष्टी जबाबदार'; कंगनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील लाॅबीवर ओढले ताशेरे 

kangana ranaut and SSR
kangana ranaut and SSR

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील लाॅबीवर अभिनेत्री कंगना रानौतने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. तिने याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर टाकलेला आहे आणि त्यामध्ये तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्थांचा खरपूस समाचार घेतला आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत चित्रपट संस्थांनीच सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केले, असे तिने यामध्ये म्हटलेले आहे. त्यातच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी तुझ्या वेदनांची मला जाणीव होती. तुला त्या लोकांनी दूर लोटलं. तू त्याबद्दल माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडला होतास अशा प्रकारचे ट्विट केल्यामुळे आता हिंदी चित्रपटसृष्टीत विविध चर्चाना उधाण आले आहे.

अभिनेत्री कंगना रानौत स्पष्टवक्ती आहे. कोणत्याही गोष्टीवर ती आपले मत परखडपणे मांडते. तिलाही या इंडस्ट्रीत उभे राहताना कित्येक समस्यांचा सामना करावा लागला. मोठमोठ्या बॅनर्सकडून तिलाही कित्येक वेळा नकार आला. पण ती कधी खचली नाही की मैदान सोडून पळाली नाही. तिने प्रत्येक गोष्टीचा सामना केला आणि आज ती खंबीरपणे उभी आहे. 

सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनामुळे ती कमालीची भावुक झाली आहे. आणि तिने त्याच्या आत्महत्येस हिंदी चित्रपटसृष्टी जबाबदार आहे असे म्हटले आहे. सुशांत हा लढणारा आणि धीट होता. तो काही कमकुवत नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मंडळींनी त्याला कमकुवत केले आणि आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यात रुजविला. इंजिनियरिंगमध्ये हुशार असणारा सुशांतचा मेंदू कमकुवत कसा असू शकतो, असा प्रश्नही तिने आपल्या व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे. 

त्याचा छिछोरे हा चित्रपट सगळ्यात चांगला होता. त्याने बिझनेसही चांगला केला. मग अन्य चित्रपटांना पुरस्कार आणि  त्याला नाही, असेही तिने म्हटलेले आहे. तिचा एकूणच हा रोख हिंदीतील नामवंत निर्मिती संस्थांवर होता. तसेच शेखर कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, की तुला ज्या लोकांनी दूर लोटले आहे त्यांच्याबद्दल मला ठाऊक आहे. तुझ्या बाबतीत जे घडले आहे ते त्यांचे कर्म आहे. तुझे नाही. तू  माझ्याशी बोलायला हवे होते असे मला वाटते. या सगळ्या प्रकारावरून सुशांतला हिंदी चित्रपटसृष्टीत डावलले जात होते की काय असा प्रश्न पडतो. 

kangana ranaut blames hindi film industry for in SSR case

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com