esakal | जामिया हिंसाचारावर अखेर प्रियांका चोप्रा बोलली, म्हणाली...
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Priyanka Chopra tweets about Jamia Milia Agitation

सोशल मीडियावर दररोज कोणी ना कोणी जामिया मिलीया हिंसाचारावरून वाद घालताना दिसतात. नेहमी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी प्रियांका चोप्रा आता या वादात उतरली आहे. तिने ट्विट करत आपले मत मांडले आहे.

जामिया हिंसाचारावर अखेर प्रियांका चोप्रा बोलली, म्हणाली...

sakal_logo
By
टीम ईसकाळ

नवी दिल्ली : जामिया इस्लामिया लाठीचार्ज प्रकरण दररोज वेगळे वळण घेत आहे. येथील विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध देशभरातून होत असतानाच, सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटत आहेत. बॉलिवूड कलाकार- निर्माते दिग्दर्शकांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या विषयावरून वाद-विवाद होताना दिसत आहेत. अशातच सोशल मीडियावर दररोज कोणी ना कोणी या विषयावरून वाद घालताना दिसतात. नेहमी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी प्रियांका चोप्रा आता या वादात उतरली आहे. तिने ट्विट करत आपले मत मांडले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रियांकाने एक अर्थपूर्ण ट्विट केले आहे. ती म्हणते, 'शिक्षण हे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्यासाठी आणि त्याला समृद्ध करण्यासाठी शिक्षण मदत करते. त्यांच्या आवाज आपण उंचावला पाहिजे. उत्तम अशा लोकशाहीत एखाद्याने आवाज उंचावल्यानंतर त्याच्यावर हिंसाचार करणे हे अत्यंत चूकीचे आहे. प्रत्येकाचे मत ग्राह्य धरले जाते आणि प्रत्येकाचा आवाज हा बदलत्या भारताचे काम करेल.' असे ट्विट तिने आज केले. 

'खरी टुकडे टुकडे गँग तुमचीच'; मोदींना रेणुका शहाणेंचे सडेतोड प्रत्युत्तर...

प्रियांका नेहमीच सामाजिक विषयांवर मत मांडत असते. मग ते निर्भया प्रकरण असो किंवा हैदराबाद प्रकरण. तिच्या स्त्रीवादी मतांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा जामिया मिलीया हिंसाचारावर भाष्य केल्याने ती चर्चेत आली आहे. 

विद्यार्थी आंदोलनावरून पुलकित भडकला; निर्मात्याला म्हणाला 'पुन्हा भेटूही नका'

जामिया मिलिया प्रकरणात सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहे. यात अनेक कलाकारांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. यात सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, विकी कौशल, स्वरा भास्कर अनुराग कश्यप यांनी आंदोलनाला समर्थन दिले.

loading image