esakal | भारतात येण्याबद्दल आदर पूनावालांची महत्त्वाची घोषणा

बोलून बातमी शोधा

Adar Poonawalla

लंडनमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी व्यावसायिक कारणासाठी लंडनला आल्याचे सांगितले होते.

भारतात येण्याबद्दल आदर पूनावालांची महत्त्वाची घोषणा
sakal_logo
By
वृत्तसंस्था

लंडन : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांतच भारतात परतेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. शनिवारी (ता.१) रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमधील आमचे भागीदार आणि भागधारक यांच्याबरोबरील बैठक चांगली झाली. पुण्यात कोव्हिशिल्डचे उत्पादन जोरात सुरू आहे, हे सांगण्यास मला आनंद होत आहे. काही दिवसांनी भारतात परतल्यावर लस निर्मितीचा आढावा मी घेईन.

हेही वाचा: Live : केरळमधील ६ जागांचे निकाल हाती

लंडनमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी व्यावसायिक कारणासाठी लंडनला आल्याचे सांगितले होते. भारताबाहेर ब्रिटनसह अन्य देशांमध्ये लस उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार असून लवकरच त्याबाबत घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले होते.

कोरोनाची दुसऱ्या लाट भारतात अधिक जीवघेणी ठरत असताना तेथे कोरोना प्रतिबंधक लशींची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दबाव येत असून धमकीचे फोन येत असल्याचेही पूनावाला यांनी मुलाखतीत सांगितले होते. कोव्हिशिल्ड लशीच्या पुरवठ्याबद्दल भारतातील काही प्रभावशाली व्यक्तींनी फोनवर बोलताना जहाल भाषा वापरली असेही ते म्हणाले. धमकीच्या फोनच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना ‘वाय’ श्रेणीतील सुरक्षा पुरविली आहे.

हेही वाचा: विराटसाठी कोचशी पंगा; कॅप्टन्सीनंतर वॉर्नरला संघातूनही डच्चू

भारताची लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता इतर देशांमध्ये लस उत्पादन घेण्याचा विचार करत आहे. लसीच्या पुरवठ्याबाबतच्या वेळेचं आश्वासन पाळण्यात अडचण येऊ लागल्यानं 'सीरम' हे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.