सज्ञान मुलगी तिच्या मर्जीनुसार कोणासोबतही राहू शकते : कोर्ट

adult girl ,  delhi high court
adult girl , delhi high court

सज्ञान मुलगी आपल्या इच्छेनुसार कोणासोबतही राहू शकते, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका 20 वर्षीय तरुणीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेम विवाह केला. या प्रकरणातील सुनावणीत दिल्ली न्यायालयाने ही टिपण्णी केली. एवढेच नाही तर मुलीच्या पतीला कोणत्याही प्रकारची धमकी किंवा अन्य कोणताही प्रकार करु नये, असे आदेशही न्यायालयाने संबंधित मुलीच्या वडिलांना दिला आहे.  

न्यायाधीश विपीन सांघी आणि रजनीश  भटनागर यांच्या पीठासमोर दाखल याचिकेवर सुनावणी केली. मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याचा दावा केला होता. पोलिसांनी मुलीला शोधावे, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती. या प्रकरणात मुलीने न्यायालयात हजर होत स्वत:च्या मर्जीने घर सोडल्याचे सांगितले. एका मुलाशी विवाह केला आहे, अशी माहितीही संबंधित मुलीने न्यायाधीशांना दिली. 

यावर कोर्ट म्हणाले की, मुलगी बेपत्ता झाली नसून तिने स्वत:च्या मर्जीने घर सोडले आहे. तिने आपल्या इच्छेनुसार जोडीदारही निवडला आहे. मुलगी सज्ञान असून तिला आपल्या स्वत:विषयीचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे.  सज्ञान मुलगी स्वत:च्या मर्जीने कुठेही आणि कुणासोबतही राहु शकते. संबंधीत मुलीला सुरक्षेसह घरी सोडण्याचे आदेशही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले.  

मुलीच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका क्लोज करताना न्यायालय म्हणाले की, मुलगी 20 वर्षांची आहे. त्यामुळे आपल्या इच्छेनुसार कोणासोबत रहायचे आणि कुठे रहायचे याचे तिला स्वातंत्र्य आहे. बळजबरीने तिच्यावर कोणताही निर्णय थोपवला जाऊ शकत नाही.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com