Afghan Boy Survives Wheel Well Flight to India Immigration Starts Repatriation Process
Esakal
देश
अहो आश्चर्यच! अफगाणिस्तानातून १३ वर्षांचा मुलगा विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून भारतात आला; जिवंत कसा राहिला?
मुलाला इराणला जायचं होतं पण तो चुकून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या व्हिल वेलमध्ये बसला. आता इमिग्रेशन विभागाकडून मुलाला काबुलला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.
अफगाणिस्तानमधील १३ वर्षांचा मुलगा विमानाच्या चाकामध्ये लपून काबुलहून दिल्लीला पोहोचला आहे. अल्पवयीन मुलाला विमानतळ प्रशासनाने ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे. मुलाला इराणला जायचं होतं पण तो चुकून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या व्हिल वेलमध्ये बसला. इमिग्रेशन विभागाकडून मुलाला काबुलला पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.

