कलम 370 हटवल्यानंतरही काश्मीर खोऱ्यातील भूखंड खरेदी थंडच

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, असा दावा सरकारने केला होता.
Reactions of people on Article 370
Reactions of people on Article 370Esakal

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 (Article 370) रद्द केल्यापासून एकाही बाहेरच्या व्यक्तीने काश्मीर खोऱ्यात (Kashmir valley) भूखंड खरेदी केलेला नाही, अशी केंद्र सरकारने (Central Government) बुधवारी राज्यसभेत दिली. कलम 370 रद्द करून जवळपास अडीच वर्षे झाली आहेत, असे असतानादेखील बाहेरील नागरिकांचे घाटीत भूखंड खरेदीचे प्रमाण शून्य आहे.

Reactions of people on Article 370
राज्यात फेब्रुवारीत कोरोना रूग्ण वाढू शकतात : राजेश टोपे

गेल्या अडीच वर्षांत जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) सात भूखंड बाहेरच्या लोकांनी विकत घेतले आहेत. हे सात भूखंड जम्मू विभागात खरेदी करण्यात आले आहेत. यापैकी एकही भूखंड काश्मीर खोऱ्यात खरेदी केलेला नसल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात म्टटले आहे. सीपीएम खासदार झर्ना दास बैद्य यांनी केंद्रशासित प्रदेशात जमीन खरेदी-विक्रीची स्थिती काय आहे? तेथील रहिवासी नसलेला नागरिक तेथे जमीन खरेदी करू शकतो का? असा प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाला उत्तर देताना राय यांनी वरील माहिती दिली आहे.

Reactions of people on Article 370
किरीट सोमय्यांना बीड दौऱ्याआधी व्हॉट्सअपवर धमकी; पोलिसांकडे तक्रार

केंद्र सरकारने 2019 मध्ये कलम 370 रद्द केले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये सरकारने अधिसूचना जारी करून जमीन महसूल कायद्यात सुधारणा केली होती. यामुळे देशाच्या इतर भागातील कोणालाही शेतजमिनीसह जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल, असा दावा सरकारने केला होता. मात्र आज सरकारने संसदेत दिलेल्या आकडेवारीवरून भूखंडाचे स्वप्न अद्याप पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com