बंगालमधील दहशतवादी कनेक्शनसंदर्भात अमित शहांनी NIA ला दिले खास आदेश

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 20 December 2020

पश्चिम बंगालमध्ये सीमेपलिकडील लश्कर ए तोएबा आणि अल कायदा यांचे नेटवर्क पसरले आहे का? याचा तपास करा, असे त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमिंत शाह दोन दिवसीय पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातील राजकीय कार्यक्रमासह त्यांच्या विभागीय अधिकांऱ्यांसोबतच्या बैठकीचा सिलसिला देखील सुरु असल्याचे दिसते. शनिवारी त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. यात त्यांनी बंगालमध्ये दहशतवादी मॉडेलसंदर्भातील तपासाचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सीमेपलिकडील लश्कर ए तोएबा आणि अल कायदा यांचे नेटवर्क पसरले आहे का? याचा तपास करा, असे त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे. एनआयएचे DIG दीपक कुमार यांच्याकडे शहांनी यासंदर्भातील तपासाचा अहवाल मागवला आहे. सप्टेंबरमध्ये एनआयए (NIA)ने उत्तर 24 परगनाच्या बदुरियामध्ये लश्करच्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तर नोव्हेंबरमध्ये अल कायदाच्या "पाकिस्तान प्रायोजित मॉड्यूल"चाही पर्दाफाश करण्यात आला होता.

हेही वाचा- फारुख अब्दुल्लांना EDचा दणका; 12 कोटींची संपत्ती जप्त

पश्चिम बंगालमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संदस्यांच्या आंदोलनावर लक्ष्य ठेवण्याचे आदेशही अमित शाह यांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या प्रवर्तन निदेशालय विभागामार्फत पीएफआयच्या कार्यालयावर  राष्ट्रव्यापी छापेमारी करण्यात आली होती. मुर्शिदाबाद आणि कोलकाता येथील कार्यालयातही ही कारवाई करण्यात आली होती.  गृह मंत्रालयाने अनेक राज्यातील पीएफआय कार्यलयावर निर्बंध घालण्याचे आदेशही दिले आहेत. अद्याप यासंदर्भात कोणताही निर्य घेण्यात आलेला नाही.  

हेही वाचा- आंदोलनाची आठवण असावी; शेतकऱ्यांना मोफत टॅटू काढून देणारा स्टॉल

एनआयएच्या अधिकाऱ्यासोबतच्या बैठकीनंतर अमित शहांनी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मभूमीचा दौरा केला. इस्लामी दहशतवादी संघटनांनी समाजाची मदत केली की  विश्वसनीयता नष्ट केली, याचा विचार मुस्लीम समाजातील लोकांनी करायला हवा, असेही शहा यांनी म्हटले आहे. पूर्वी मिदनापुरमध्ये अमित शहांनी बलिजुरी गांवातील एका शेतकऱ्याच्या घरी जेवण केले. यापूर्वी एका रॅलीमध्ये देखील ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shah holds meeting with NIA officials in Kolkata seeks reports to investigate terrorist module in Bengal