INS 'विक्रांत' नंतर विक्रमवीर 'विराट'सुद्धा भंगारात

INS-Vikrant
INS-Vikrant

भारतीय नौदलाच्या सेवेत ( Indian Navy ) सर्वाधिक काळ कार्यरित असणारं विमानवाहू जहाज म्हणजे 'आयएनएस विराट (INS VIRAT)'. आयएनएस विराट हे भारतीय नौदलाच्या इतिहासातील एकमेव असं विमानवाहू जहाज आहे जे सलग 30 वर्ष देशाच्या सेवेत होतं. आयएनएस विराटच्या या विक्रमी 30 वर्षाच्या सेवेची गिनीज बुकमध्ये नोंदही झाली आहे. आता हे आयएनएस विराट विमानवाहू जहाज मोडीत निघालं आहे. काही दिवसातच हे जहाज गुजरातच्या 'अलंग' या शीप ब्रेकींग यार्डात मोडीत निघणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'श्री राम गुप्ता' या गुजरातमधील सर्वात मोठ्या शीप रिसाइकल ग्रुपने (ship recycling) ही जहाज आता विकत घेतली आहे. 'सर्व व्यवहारानंरतर आज आम्हाला आयएनएस विराटची डिलीवरी मिळाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आयएनएस विराट अलंगमध्ये येईल. जर पाऊसामूळे या जहाजाला येण्यास उशीर झाला तर ते जास्तीतजास्त सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत अलंगमध्ये येईल, अशी माहिती श्री राम गुप्ता ग्रुपचे संचालक मुकेश पटेल यांनी दिली आहे. श्री राम गुप्ता ग्रुपने यापुर्वी Clemenceau ही फ्रेंच विमानवाहू जहाजही विकत घेतलं होतं. पण यावर फ्रान्समध्ये यावर मोठा वाद झाल्याने मधूनच हे जहाज माघारी बोलावण्यात आलं होत.

सध्या आयएनएस विराट हे मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये (mumbai naval dockyard ) आहे. काही दिवसातच खंबातच्या आखाती (Gulf of Khambhat) भागातील अलंग या शीप ब्रेकिंग यार्डकडे जाईल. गेल्या सहा वर्षांतील आयएनएस विराट हे भारतामध्ये तोडण्यात येणारे हे दुसरे विमान वाहक जहाज असणार आहे. पाकिस्तानसोबत झालेल्या ऐतिहासिक युद्धात  महत्वाची भूमिका बजावणारे 'आयएनएस विक्रांत' (INS Vikrant) हे 2014 मध्ये मुंबईत मोडले गेले. मोदी सरकारने संसदेमध्ये जुलै 2019 मध्ये आयएनएस विराटला तोडण्याचा निर्णय घेतला होता. 'आम्हाला डीजी शिपिंगकडूनही (Directorate General of Shipping) परवानगी हवी आहे. या विमानवाहू जहाजला मुंबई ते अलंग, भावनगर जिल्हा दरम्यानचे अंतर पार करण्यासाठी  सुमारे चार दिवस लागतील,' असे पटेल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com