
Central Government Farmer Scheme
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना एक मोठी भेट देणार आहेत. आज, ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ते देशातील शेतकऱ्यांसाठी ४२,००० कोटी रुपयांच्या नवीन योजना सुरू करतील. ज्याचा त्यांना थेट फायदा होईल. ही माहिती देताना, देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, या निमित्ताने पंतप्रधान दोन प्रमुख कार्यक्रम सुरू करतील. प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना आणि डाळींसाठी स्वावलंबन अभियान.