मित्र आणि विश्वासू सहकारी गमावला; पटेलांच्या निधनावर सोनिया गांधींची प्रतिक्रिया

    Ahmed Patel, Ahmed Patel Death,  Sonia Gandhi,Ahmed Patel News,  Narendra Modi
Ahmed Patel, Ahmed Patel Death, Sonia Gandhi,Ahmed Patel News, Narendra Modi

Ahmed Patel dies Congress president Sonia Gandhi condoles काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते अहमद पटेल यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. 71 वर्षी नेत्याचे काँग्रेसमधील योगदान खूप मोठे असून त्यांच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात काँग्रेस नेत्यांकडून उमटताना दिसत आहे.

अहमद पटेल यांना काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देशातील अन्य दिग्गज नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. मी एक मित्र आणि प्रामाणिक सहकारी गमावला, अशा शब्दांत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोनिया गांधी म्हणाल्या की, अहमद पटेल यांच्या रुपात मी एक प्रामाणिक सहकारी गमावला आहे. त्यांनी आपले जीवन काँग्रेस पक्षासाठी समर्पित केले. प्रामाणिक मित्र आणि सहकाऱ्याच्या जाण्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबियांच्या दुख:त सहभागी आहे, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.  

अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विश्वासू सहकार्यांपैकी एक होते. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार म्हणून ते काम पाहत होते. पक्षाच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी बजावणाऱ्या पटेलांनी काँग्रेसचे संकटमोचक म्हणूनही विशेष ओळख निर्माण केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com