

Man Who Survived Ahmedabad Plane Crash Now Lives Isolated Refuses to Speak
Esakal
अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचलेल्या विश्वास कुमार रमेशचं दुर्घटनेनंतरचं आयुष्य अजूनही नेहमीसारखं झालं नाहीय. विमान दुर्घटनेत २४१ पैकी फक्त एकटा विश्वास कुमार रमेश वाचला होता. दुर्घटनेला चार महिने झाले तरी आजही विश्वास कुमार बहुतांश वेळ एकटाच बसतो. कुटुंबियांशीसुद्धा तो कमी वेळ बोलतो. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं मी वाचलो हा एक चमत्कार आहे आणि स्वत:ला नशीबवान समजतो असं सांगितलंय.