
अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. विमान कोसळण्याआधी दोन्ही पायलटमध्ये काय संवाद झाला हेसुद्धा यात नोंदवण्यात आलंय. कॉकपिट रेकॉर्डिंगमध्ये पायलटकडून इंजिनचा इंधन पुरवठा बंद केल्याचा दावा केला जात आहे. हा रिपोर्ट अमेरिकेच्या ब्लूमबर्ग आणि वॉल स्ट्रिट जर्नलसारख्या वृत्तसंस्थांनी जारी केलाय. यात दावा केलाय की, कॅप्टन सुमित सभरवाल यांनी फ्यूएल कंट्रोल स्विचला कटऑफ पोजिशनमध्ये टाकलं. मात्र भारताच्या विमान अपघात तपास संस्थेनं हा रिपोर्ट सत्याच्या कसोटीवर न तपासता केल्याचं म्हणत याचा निषेध केलाय. हे रिपोर्ट AAIBने फेटाळून लावलेत.