AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Raghuram Rajan on AI : कौशल्ये विकसित करण्यासाठी भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असंही सांगितलंय.
Former RBI Governor Raghuram Rajan discussing the impact of artificial intelligence on jobs, employment trends, and the future workforce.

Former RBI Governor Raghuram Rajan discussing the impact of artificial intelligence on jobs, employment trends, and the future workforce.

esakal

Updated on

Will Artificial Intelligence Eliminate Jobs? : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या विकासामुळे भविष्यातील नोकऱ्यांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की एआय कधीही त्या नोकऱ्या संपवू शकणार नाही, ज्या कौशल्यांशी निगडीत आहे.

ते म्हणाले की कौशल्ये विकसित करण्यासाठी भारताच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. देशात ज्या पद्धतीने कार्यबळ तयार होत आहे, त्यामध्ये त्वरित सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

उद्योजक कुशल लोढा यांच्या पॉडकास्टमध्ये रघुराम राजन म्हणाले की भारत वेगाने एआय-संचालित भविष्याकडे वाटचाल करत आहे, परंतु त्याचे कार्यबळ कमी प्रशिक्षित आहेत आणि अनेक प्रकरणांमध्ये कुपोषितही आहेत.

Former RBI Governor Raghuram Rajan discussing the impact of artificial intelligence on jobs, employment trends, and the future workforce.
Bonnie Blue Video : १२ तासांत तब्बल १०५७ पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा करणारी, ‘बॉनी ब्लू’ अखेर इंडोनेशियातूनही हद्दपार

याशिवाय  भारतातील तरुणांना रोजगारासाठी कसे तयार करायचे यावर राष्ट्रीय स्तरावर पुनर्विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. राजन म्हणाले की, काही क्षेत्रांमध्ये असे रोजगार उपलब्ध आहेत जिथे प्रत्यक्ष काम करावे लागते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही, कदाचित प्लंबरची कामे संपुष्टात येणार नाही.

Former RBI Governor Raghuram Rajan discussing the impact of artificial intelligence on jobs, employment trends, and the future workforce.
Hardik Pandya Sixes Video : हार्दिकने 'राउडी' स्टाइलमध्ये एकाच षटकात ठोकलेले दोन कडक ‘सिक्स’ पाहून ‘BCCI’पण प्रचंड खूश म्हटले...

तसेच, रघुराम राजन यांनी यावेळी ही धारणा देखील नाकारली की यशासाठी पारंपारिक शैक्षणिक मार्गाची आवश्यकता असते. मात्र ते म्हणाले, "मला फ्रेंच साहित्य किंवा इंग्रजी साहित्यात पदवीची आवश्यकता नाही. मी आधुनिक प्लंबिंगमध्ये तांत्रिक अभ्यासक्रम करण्यास देखील तयार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com