

British adult content creator Bonnie Blue, also known as Tia Billinger, amid international controversy following her deportation from Indonesia.
esakal
British adult content creator Bonnie Blue faces controversy after being deported from Indonesia : वादग्रस्त ब्रिटिश अडल्ट कंटेंट क्रिएटर बॉनी ब्लू उर्फ टिया बिलिंगर हिला इंडोनेशियाच्या बाली येथून हद्दपार करण्यात आले आहे. तिला किमान १० वर्षांसाठी इंडोनेशियामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. इंडोनेशियाने शुक्रवारी बोनी ब्लूला देशातून हद्दपार केले. २०२५ च्या सुरुवातीला बोनी ब्लूने १२ तासांत तब्बल १०५७ पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवून जागतिक विक्रम मोडल्याचा दावा करून ती प्रसिद्धी झोतात आली होती.
अशाच वादांमुळे बोनी ब्लूला यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि फिजीमधूनही हद्दपार करण्यात आले आहे. अलिकडची घटना बालीमध्ये घडली, जिथे बोनी निळ्या पिकअप ट्रकमध्ये फिरत होती आणि कथितरित्या अडल्ट कंटेट शूट करत होती.
एका जबाबदार नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका स्टुडिओवर छापा टाकला, जिथे बोनीला दोन ब्रिटिश आणि एक ऑस्ट्रेलियन अशा इतर तीन पुरुषांसह ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांच्यावर इंडोनेशियाच्या कडक पोर्नोग्राफी कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला, ज्यासाठी १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो.
मात्र तपासात बोनी ब्लूविरुद्ध पोर्नोग्राफीचा कोणताही पुरावा आढळला नाही. त्याऐवजी, तिला तिच्या टुरिस्ट व्हिसाचा गैरवापर आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले, ज्यामध्ये परवान्याशिवाय गाडी चालवणे आणि वाहन नोंदणी न करणे यांचा समावेश आहे. न्यायालयाने बोनीवर एक छोटासा दंड ठोठावला आणि तिला हद्दपारीचे आदेश दिले.
इमिग्रेशन प्रमुख हेरू विनार्को म्हणाले, "ती सुट्टीवर आली होती, परंतु तिच्या व्हिसाचा गैरवापर करून ती कंटेट तयार करत होती." बोनी कोर्टातून बाहेर पडताना हसत आणि कॅमेऱ्यासमोर चुंबन घेताना दिसली. हे बोनीच्या सवयींचा एक भाग असल्याचे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.