esakal | INI-CET 2021 परीक्षा एक महिना पुढे ढकला; SC चे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

SC-Delhi

INI CET परीक्षेसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आदेश दिले आहेत.

INI-CET 2021 परीक्षा एक महिना पुढे ढकला; SC चे आदेश

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर INI - CET 2021 च्या परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एम्सचे सर्व मेडिकल कोर्स, JIPMER abs, PGIMER आणि NIMHANS च्या प्रवेशासाठी 16 जून तारीख निश्चित करण्यात आली होती. आता ही प्रवेश प्रक्रिया किमान महिनाभर पुढे ढकलण्यात येणार आहे. NEET PG मेडिकल परीक्षा आधीच ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. NEET PG मेडिकल परीक्षा आणि INI CET परीक्षा यामध्ये तयारीसाठी एक महिना वेळ मिळावा असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा: मे महिन्यात 121 वर्षात दुसरा सर्वाधिक पाऊस- आयएमडी

कोरोना ड्युटीवर असलेल्या उमेदवारांनी निवडलेलं परीक्षा केंद्र हे लांब आहे. त्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत 16 जूनला परीक्षा घेणं योग्य होणार नाही. त्यामुळे एम्सला आदेश देण्यात येत आहेत की, परीक्षा किमान एक महिना लांबणीवर टाकाव्यात.

न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि न्यायाधीश एमआर शहा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली. INI CET परीक्षेसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना परीक्षा पुढे ढकलण्याबाबत आदेश दिले आहेत. न्यायालायने दोन याचिकांवर सुनावणी केली. यामध्ये 23 एमबीबीएस डॉक्टरांनी एक आणि IMA सह मेडिकल स्टुडंट नेटवर्कमधील कोरोना ड्युटी करणाऱ्या 35 डॉक्टरांनी दाखल केलेल्या याचिकेचा समावेश होता.