Air India AI-2030 : अपहरणाच्या अलर्टमुळे एअर इंडियाचे विमान जयपूरला वळवले; प्रवाशांची तपासणी सुरू, NSG अन् IB सतर्क

Flight Hijack Alert : नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI-2030 विमानाबाबत अपहरणाची धोक्याची सूचना मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानाबाबत सूचना मिळाल्यानंतर विमान जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले.
Air India AI-2030 Diverted to Jaipur After Hijack Alert

Air India AI-2030 Diverted to Jaipur After Hijack Alert

esakal

Updated on: 

Air India AI-2030 Diverted to Jaipur After Hijack Alert : जर्मनीतील फ्रँकफर्टहून नवी दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाबाबत अपहरणाची धोक्याची सूचना मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली. या सूचनेनंतर AI-2030 हे विमान तातडीने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. विमानाला विशेष सुरक्षित क्षेत्रात हलवण्यात आले असून, प्रवाशांची सुरक्षा तपासणी करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकासह विविध सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com