
Air India Statement : गुजरातहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं एक प्रवाशी विमान गुजरातच्या अहमदाबादच्या निवासी भागात विमान कोसळल्याच्या घटनेची एअर इंडियानं पुष्टी केली आहे. तसंच या विमानातून किती देशातील प्रवाशी आणि किती प्रवाशी प्रवास करत होते याची देखील माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाची माहिती नागरिकांना विशेष हॉटलाईनमार्फत दिली जाणार आहे.