

Air India flight AI-321 entered Pakistan airspace due to navigation failure
esakal
Air India Flight Incident: भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशांची हवाई क्षेत्रे एकमेकांच्या विमानांसाठी साधारणपणे बंद असतात. मात्र, सोमवारी रात्री अशी एक घटना घडली जेव्हा दिल्लीहून अमृतसरला जाणारे एअर इंडियाचे विमान (AI-321) आपल्या निर्धारित मार्गावरून भरकटले आणि पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरले. त्यानंतर पाकिस्तानी एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) चेतावणी दिली आणि विमान परत फिरवण्याचे निर्देश दिले.