

Air India flight Turbulence
Esakal
फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात धक्के बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या विमानाच्या पायलटची डोप टेस्ट केल्यानंतर तो नशेत असल्याचं आढळून आल्यानं खळबळ उडालीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डोप टेस्ट पॉझिटिव्ह येताच त्याला ड्युटीवरून काढून टाकण्यात आलं. दरम्यान, विमानाला बसलेल्या अचानक धक्क्यामुळे क्रू मेंबर्ससह काही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उंचीवर असताना विमान अचानक खाली आल्या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही पायलटना ड्युटीवरून हटवण्यात आलंय.