प्लान बदलला तरी टेन्शन नाही! एअर इंडियाकडून प्रवाशांना मोठा दिलासा | Air India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

air india

प्लान बदलला तरी टेन्शन नाही! एअर इंडियाकडून प्रवाशांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : एअर इंडियाने (Air India) कोविड-19 ची अनिश्चितता (Covid 19) लक्षात घेत प्रवाशांना सर्व देशांतर्गत उड्डाणांच्या तारखेत (Flight Date & Flight Number) आणि विमान क्रमांकामध्ये बदल करण्याची सुविधा जाहीर केली आहे. ही सुविधा प्रवाशांना एकदाच वापरता येणार आहे. याबाबत एअर इंडियाने ट्वीट केले आहे. देशांतर्गत (Domestic Flight ) प्रवासी 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वीच्या प्रवासाची तारीख किंवा फ्लाइट क्रमांक बदलू शकतात, असे एअर इंडियाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. एअर इंडियाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Air India Offering 𝐎𝐍𝐄 𝐅𝐑𝐄𝐄 𝐂𝐇𝐀𝐍𝐆𝐄 of Date Or Flight Number & Sector For All Domestic Tickets)

एअर इंडियाने (Air India) ट्विटमध्ये म्हटले आहे की, "कोविडच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे निर्माण झालेली अनिश्चितता लक्षात घेऊन, एअर इंडिया 31.03.22 रोजी किंवा त्यापूर्वी कन्फर्म केलेल्या प्रवासासह सर्व देशांतर्गत तिकिटांसाठी (098) तारीख किंवा फ्लाइट क्रमांक बदलण्याची मोफत ऑफर देत आहे. (Domestic Air Travel )

हेही वाचा: शरद पवारांनी शब्द दिलाय; कामावर या! कृती समितीचे ST कर्मचाऱ्यांना आवाहन

कोविडमुळे विमान कंपन्यांवर दबाव

कोविड रूग्णांमध्ये वाढ झाल्याने एअरलाइन उद्योग प्रचंड दबावाखाली आला आहे. कोविडची वाढती रूग्णसंख्या पाहता इंडिगोने आपल्या फ्लाइटच्या संख्येमध्ये 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोचे म्हणणे आहे की, प्रवास सुरू होण्याच्या किमान 72 तास आधी फ्लाइट रद्द केली जाईल आणि ग्राहकांना पुढील फ्लाइटमध्ये शिफ्ट केले जाणार असल्याचे इंडिगोतर्फे सांगण्यात आले आहे. याशिवाय कोविडची वाढती प्रकरणे पाहता कंपनीने 31 जानेवारीपर्यंत प्रवाशांकडून कोणतीही 'चेंज फी' आकारणार नाहीये. त्यामुळे प्रवाशांच्या गरजेनुसार, प्रवासी त्याच पैशातून 31 जानेवारीपर्यंत इतर कोणत्याही फ्लाइटचे तिकीट काढू शकणार आहेत.

हेही वाचा: राजधानी दिल्लीत लादले जाऊ शकतात आणखी काही निर्बंध?

स्पाइसजेट कडूनही शुल्क माफची घोषणा

स्पाइसजेटने देखील 31 जानेवारीपर्यंतचे बदल शुल्कही माफ केले आहे. जे प्रवासी कोरोनामुळे प्रवासाचा प्लॅन बदलत आहेत, ते 31 जानेवारीपर्यंत इतर कोणत्याही फ्लाइटमध्ये कोणत्याही तारखेसाठी तिकीट घेऊ शकतात. इच्छित आसन घेण्यासाठी प्रवाशांना शुल्कात 25 टक्के सवलत दिली जाणार असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top