एअर इंडियाचा सरकारी अधिकाऱ्यांना दणका; थकबाकी द्या मगच प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

एअर इंडिया 10 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सरकारी विभागांच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना तिकिटे नाकारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध सरकारी विभागांकडून एअर इंडियाच्या तिकिटांसाठी देय रकमेची थकबाकी 268 कोटी रुपयांवर पोचली आहे.

नवी दिल्ली - एअर इंडिया 10 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या सरकारी विभागांच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना तिकिटे नाकारणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध सरकारी विभागांकडून एअर इंडियाच्या तिकिटांसाठी देय रकमेची थकबाकी 268 कोटी रुपयांवर पोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणत्या विभागाला तिकिटे नाकरली?
एअर इंडियाने कामाची पद्धत बदलत प्रथमच अनेक दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारी विभागाच्या थकबाकीदार कर्मचाऱ्यांना तिकिटे नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्तवसुली संचालनालय (ईडी), गुप्तहेर विभाग (आयबी), , इंडियन ऑडिट बोर्ड, कन्ट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स आणि बीएसएफचा समावेश आहे.

'आरएसएसचा पंतप्रधान' आणि 'खोट्यांचा सरदार'; राहुल गांधी-भाजप आमने-सामने 

सरकारी कर्मचाऱ्यांकडून नेहमी एअर इंडियानेच प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. जर नियोजित ठिकाणी एअर इंडियाची सेवा उपलब्ध नसेल तेव्हाच खासगी विमान कंपनीने प्रवास केला जातो. दुर्दैवाने या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडूनच एअर इंडियाच्या तिकिटाची रक्कम थकवण्यात येते. या कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागाकडून वेळोवेळी थकबाकीची देय रक्कम न चुकती केल्यामुळे एअर इंडियाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. 

राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही

एअर इंडियावर कर्जाचा डोंगर
गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया कर्जाच्या विळख्यात सापडली असून कंपनीवर कर्जाचा मोठा डोंगर आहे. अलीकडेच सरकारचे एअर इंडियाचे पूर्ण खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाला हे पाऊल उचलावे लागले आहे. एअर इंडियाने या प्रकारची भूमिका घेतल्यानंतर थकलेल्या रकमेची काही प्रमाणात वसूली होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या काही आठवड्यात विविध सरकारी विभागांकडून जवळपास 50 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: air india rejects tickets to government officers over 10 lakh rupees outstanding