सीटवर लघवी केल्याच्या आरोपाला पीडितेचं सडेतोड उत्तर; मुंबईच्या मिश्राबद्दल सांगितली मोठी गोष्ट I Air India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India Case

एअर इंडिया प्रकरणात डीजीसीएनं एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावलीये.

Air India : सीटवर लघवी केल्याच्या आरोपाला पीडितेचं सडेतोड उत्तर; मुंबईच्या मिश्राबद्दल सांगितली मोठी गोष्ट

एअर इंडिया प्रकरणातील (Air India Case) पीडितेनं शंकर मिश्राच्या (Shankar Mishra) आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. शंकर मिश्राच्या वकिलानं कोर्टात सांगितलं होतं की, 'पीडितेनं स्वतः तिच्या सीटवर लघवी केली होती.'

त्यावर आता पीडितेचं वक्तव्य समोर आलंय. पीडितेनं हे आरोप खोटे आणि अपमानास्पद असल्याचं म्हटलंय. शंकर मिश्रावर एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये दारूच्या नशेत एका वृद्ध महिलेच्या सीटवर लघवी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर शंकर मिश्राला अटक करण्यात आली. आता शंकर मिश्राच्या वकिलानं कोर्टात सांगितलं की, 'पीडितेनंच स्वतः तिच्या सीटवर लघवी केलीये.'

हेही वाचा: Shraddha Case : आफताबने 'या' हत्याराने केले श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे; शवविच्छेदन अहवालात मोठा खुलासा

वकिलानं स्पष्ट केलं की, पीडित महिला गेल्या 30 वर्षांपासून भरतनाट्य करत आहे. त्यामुळं तिला मूत्रमार्गात असंयम असणं सामान्य आहे. मिश्राच्या या दाव्यावर महिलेनं तिच्या वकिलामार्फत निवेदन जारी केलंय. यामध्ये महिलेनं म्हटलंय की, "आमच्या लक्षात आलंय की, पटियाला हाऊस कोर्टात आरोपीच्या वतीनं माझ्याविरुध्द बदनामीकारक आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप पूर्णपणे खोटे आणि अत्यंत अपमानास्पद आहेत. आपल्या मूर्खपणाच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करण्याऐवजी, आरोपी पीडितेला त्रास देण्यासाठी त्याच्याविरुद्ध दिशाभूल करणारी मोहीम चालवत आहे."

हेही वाचा: मोठी बातमी! काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचं निधन; भारत जोडो यात्रेत आला हृदयविकाराचा झटका

विशेष म्हणजे, एअर इंडिया प्रकरणात डीजीसीएनं एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावलीये. नोटिसीमध्ये, डीजीसीएनं एअर इंडियानं या प्रकरणाची चुकीची हाताळणी केल्याचा दावा केलाय. 26 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्कहून नवी दिल्लीच्या फ्लाइटमध्ये आरोपी शंकर मिश्रानं पीडित महिलेच्या सीटवर कथितपणे लघवी केली होती. या प्रकरणी पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी शंकर मिश्राला यापूर्वी बंगळुरू येथून अटक केली होती. त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.