
विमान प्रवास होणार स्वस्त! Indigoने सुरु केली 100 उड्डाणे; मार्ग अन् तिकीट जाणून घ्या
विमान प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला विमानाने प्रवास करणे सोपे होणार आहे. वास्तविक, इंडिगो एअरलाइन आज 27 मार्चपासून देशातील प्रमुख शहरांसाठी 100 देशांतर्गत उड्डाणे सुरू करत आहे. इंडिगोने ही माहिती दिली आहे. यापूर्वी, इंडिगोने एका निवेदनात म्हटले आहे की उन्हाळ्यासाठी तयार केलेल्या नियोजनाचा भाग म्हणून 27 मार्चपासून 20 मार्गांवर उड्डाणे सुरू करणार आहेत. एवढेच नाही तर कंपनी इतर 6 हवाई मार्गांवर आपली उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहे. याशिवाय इंडिगोने प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम (RCS) अंतर्गत प्रयागराज आणि लखनऊ दरम्यान हवाई सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. (Air travel will be cheaper! Indigo launches 100 flights; Find out the route ticket)
हेही वाचा: व्हायग्रा घेऊन आला 81 वर्षाचा पती; पत्नीने नकार दिल्याने केले वार
इंडिगोने दिली ही माहिती-
इंडिगोचे मुख्य रणनीती आणि महसूल अधिकारी संजय कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "नवीन उड्डाणे सुरू केल्यामुळे, इंडिगोचे हवाई परिचालन अधिक मजबूत होईल आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील. प्रवाशांच्या मागणीनुसार कंपनी नवीन हवाई मार्गांवर उड्डाण करत राहील. ते म्हणाले की, हवाई वाहतूक सामान्य झाल्यामुळे प्रवाशांची सोय होईल आणि विमान कंपन्यांच्या व्यवसायालाही यातून चालना मिळेल.
हेही वाचा: Video: तब्बल 600 आर्मी जवान हवेत झेपावले; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
या मार्गांवर उड्डाणे होणार सुरू-
इंडिगो एअरलाइनने सांगितले की, 'ते हुबळी-हैदराबाद, तिरुपती-तिरुचिरापल्ली, पुणे-मंगळुरु, पुणे-विशाखापट्टणम आणि जम्मू-वाराणसी अशा मार्गांवर उड्डाणे सुरू करणार आहे. ही उड्डाणे केवळ उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम यांच्यातील आंतर-प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत करणार नाहीत तर या प्रदेशांमध्ये व्यापार आणि पर्यटनालाही चालना देतील.
Web Title: Air Travel Will Be Cheaper Indigo Launches 100 Flights Find Out The Route Ticket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..