Airtel | ग्राहकांना झटका! प्लॅनच्या दरात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airtel

Airtel | ग्राहकांना झटका! 20 टक्क्यांनी दरात केली वाढ

नवी दिल्ली : देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने (bharati airtel) आपल्या विविध प्रीपेड प्लॅनच्या (prepaid plan) किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत. नव्या दरानुसार जवळपास सर्वच प्लॅनमध्ये 25 टक्क्यांची वाढ होणार आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसू शकतो.

प्लॅनमध्ये तब्बल २०-२१ टक्क्यांनी वाढ

भारती एअरटेलने सोमवारी 26 नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या विविध सेवांसाठी दूरसंचार ग्राहकांसाठी दरात वाढ केली असून, हा निर्णय “आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडेल” साठी आहे असं सांगितलं आहे. कंपनीने प्रीपेड टॅरिफ 20-25 टक्क्यांनी आणि डेटा टॉप-अप प्लॅनमध्ये 20-21 टक्क्यांनी वाढ केली आहे. प्रति ग्राहकामागे सरासरी 200 रुपये प्राप्तीचे उद्दिष्ठ सुरुवातीला कंपनीकडून ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये बदल करून ते 300 रुपये एवढे करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रिपेड प्लॅनच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. प्लॅनच्या किमतीमध्ये 25 टक्के वाढ होणार असून, येत्या 26 नोव्हेंबरपासून नवे दर लागू केले जातील. मिळालेल्या पैशांमधून आम्हला आमच्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यास मदत होणार असल्याचेही कंपनी म्हटले आहे.

हेही वाचा: GST | 5 टक्क्यांचा टप्पा होणार रद्द? मोदी सरकार करणार मोठे बदल

भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ऑगस्टमध्ये टेलिकॉम उद्योगासाठी दरवाढ हाच एकमेव मार्ग असल्याचे सांगितले होते. “आम्ही आमचे काम मर्यादित पद्धतीने केले आहे, आमचा संयम संपला आहे आणि आम्ही सर्व वेळ आउटलाअर होऊ शकत नाही,” मित्तल यांनी कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या कॉलनंतर सांगितले. आज सकाळी एअरटेलच्या निवेदनात असे म्हटले आहे की दरवाढीमुळे पायाभूत सुविधांमध्ये “भरीव गुंतवणूक” (substantial investments) होईल आणि भारतात ५ जी स्पेक्ट्रम आणण्यात मदत होईल.

“भारती एअरटेलने नेहमी मेंटेन ठेवले आहे की मोबाइल सरासरी महसूल प्रति वापरकर्ता (ARPU) २०० रुपये आणि शेवटी ३०० रुपये असणे आवश्यक आहे, जेणेकरून भांडवलावर वाजवी परतावा मिळू शकेल ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या निरोगी व्यवसाय मॉडेलला अनुमती मिळेल.” कंपनीने एका निवेदनात, दूरसंचार उद्योगाच्या ग्राहकांकडून व्युत्पन्न केलेल्या महसुलाचा संदर्भ दिला आहे.

हेही वाचा: 'हा' देश बनवणार जगातील पहिली 'बिटकॉइन सिटी'!

अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ

कंपनीने सर्वच अनलिमिटेड प्लॅनच्या दरांमध्ये वाढ केली आहे. अनलिमिटेड प्लॅनचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. तर 28 दिवसांची मुदत असलेल्या 75 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो आता 99 रुपये करण्यात आला आहे. तसेच 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये वाढ करून तो 179 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तसेच 219 रुपयांच्या प्लॅनसाठी आता 265 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केल्या या अचानक दरवाढीमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसण्याची शक्याता आहे

loading image
go to top