
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर संघर्ष सुरू आहे. भारतीय लष्कराने सुट्टीवर असणाऱ्या जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून त्यांना तात्काळ ड्युटीवर हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, रामपूर पोलीस लाइन इथं तैनात असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसातील एका पोलीस हवालदाराने युद्धात देशाची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केलीय. देशसेवेसाठी युद्ध लढण्याची इच्छा असून मला त्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारं पत्र हेड कॉन्स्टेबलनं पोलीस महासंचालकांना लिहिलंय. हे पत्र लिहिल्यानंतर सायंकाळी पोलिसाची बदली लखीमपूर खीरी इथं करण्यात आली.